आजारामुळे आलेल्या नैराश्यातून वयोवृद्ध महिलेची आत्महत्या

मुलुंड येथील घटना; स्वतला पेटवून जीवन संपविले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – आजारामुळे आलेल्या मानसिक नैराश्यातून आनंदी एस. मुदलीयार नावाच्या एका ६८ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेने आत्महत्या केल्याची घटना घटना शुक्रवारी दुपारी मुलुंड परिसरात घडली. घरात कोणीही नसताना आनंदीने स्वतला पेटवून जीवन संपविले होते. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. दुपारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता मुलुंड येथील एलबीएस रोडवरील भांडुप सोनापूर सिग्नलजवळील ओपल अपार्टमेंटमध्ये घडली. सोळा मजल्याची ही इमारती असून याच अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावर आनंदी मुदलीयार ही तिच्या पतीसोबत राहत होती. तिचा मुलगा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. शुक्रवारी दुपारी तिचा पती जेवण आणण्यासाठी बाहेर गेले होते. यावेळी घरात आनंदी ही एकटीच होती. काही वेळानंतर तिच्या घरातून धूर येऊ लागल्याने स्थानिक रहिवाशांनी ही माहिती मुलुंड पोलिसांना दिली. या माहितीनंतर मुलुंड पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरवाजा आतून बंद होता, त्यामुळे या जवानांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. यावेळी सोफावर आनंदी बसली होती. सोफ्यासह ती आगीत पूर्णपणे भाजली होती. तिला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करणत आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

प्राथमिक तपासात आनंदी ही गेल्या काही वर्षांपासून आजारी होत्या. त्यावर तिच्यावर औषधोपचार सुरु होते. सतत औषध घेतल्यानंतर तिला मानसिक नैराश्य आले होते. याच नैराश्यातून घरात कोणीही नसताना तिने स्वतला पेटवून आत्महत्या केल्याचे बोलले जाते. शनिवारी ७ सप्टेंबरला त्यांच्या घरी गणपतीचे आगमन झाले होते. दिड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आनंदी ही प्रचंड तणावात होती. अखेर शुक्रवारी पती जेवण आणण्यासाठी बाहेर गेल्याने तिने स्वतला पेटवून आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या पतीसह मुलाची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नाही. या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page