घाटकोपर येथे पूर्ववैमस्नातून दोन बंधूंवर प्राणघातक हल्ला
एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी; सातजणांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ सप्टेंबर २०२४
मुंबई, पूर्ववैमस्नातून दोन बंधूंवर तेरा ते पंधराजणांच्या एका टोळीने तलवारीसह चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली. या हल्ल्यात परेश संजय गोटल या २८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मोठा भाऊ प्रथमेश संजय गोटल हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी हत्या, हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सात मारेकर्यांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली. अनुराग रामचंद्र यादव ऊर्फ लाला, निखील कल्याण कांबळे, करण गणेश शिंदे, तौसिफ याकूब अन्सारी, रोशन नरेंद्र शिलमुल्ला, प्रफुल्ल वसंत दावडे आणि सागर मधुकर टेकाडे अशी या सातजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने सातही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत जय ऊर्फ युसूफ अन्सारी, नेट्या बाळा ऊर्फ जितेश खैरनार, अजय भोसले ऊर्फ अज्जू, राहुल सपकाळ, संदेश अग्रवालसह इतरांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून या आरेापींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घाटकोपर येथील भटवाडी, रामजीनगर, शिवनेरी सेवा मंडळ, चिकन शॉपजवळ घडली. याच परिसरात प्रथमेश संजय गोटल हा त्याच्या कुटुंबियासोबत राहत असून परेश हा त्याचा लहान भाऊ आहे. अटक आणि पाहिजे आरोपी याच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचे आरोपीसोबत एका क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. त्याचा आरोपींच्या मनात प्रचंड राग होता. याच वादातून मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता त्यांच्यात शिवनेरी सेवा मंडळाच्या चिकन शॉपजवळ पुन्हा वाद झाला होता. यावेळी आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने प्रथमेश आणि परेश यांच्यावर तलवारीसह चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. स्थानिक रहिवाशांनी या आरोपींना थांबविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी या रहिवाशांना त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. हल्ल्यानंतर सर्व आरोपी पळून गेले होते. ही माहिती प्राप्त होताच घाटकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या या दोन्ही बंधूंना पोलिसांनी तातडीने घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाख केले होते. तिथे परेश गोटल याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी झालेल्या प्रथमेशला नंतर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले होते. त्याच्या डोक्याला, खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर संबंधित सर्व आरोपीविरुद्ध पोलिसांनी १०३ (१), १०९, ११५ (२), ३५१ (३), १८९ (२), (४), १९१ (२), १९० भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अनुराग यादव, निखील कांबळे, करण शिंदे, तौसिफ अन्सारी, रोशन शिलमुल्ला, प्रफुल्ल दावडे आणि सागर टेकाडे या सातजणांना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. या आरोपीकडून गुन्ह्यांतील तलवार आणि चाकू हस्तगत करण्यात आले आहे. अटकेनंतर या सर्वांना दुसर्या दिवशी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांचे इतर सहकारी पळून गेल्याने त्याचंा पोलिसांकडून शोध सुरु आहे. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या हत्येसह हत्येच्या प्रयत्नाच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.