मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – खार परिसरातील एका पॉश स्पामध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी अमरीन हसीब शेख या मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यांत तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यात आलम, मुस्कान आणि टी नोसेने लेप्ला यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय सहितेसह पिटा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन महिलांची सुटक केली असून मेडीकलनंतर त्या तिघींनाही जोगेश्वरीतील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
खार येथील लिंकिंग रोड, लिाए इमारतीच्या आठव्या मजल्यावर मिझामार थाई नावाचे एक स्पा आहे. या स्पामध्ये काम करणार्या महिलांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालविला जात असल्याची माहिती अंमलबजावणी विभागाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे बोगस ग्राहक पाठवून त्याची शहानिशा केली होती. त्यात तथ्य असल्याचे आढळून येताच मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता तिथे पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी मॅनेजर म्हणून काम करणार्या अमरीन शेख हिला पोलिसांनी अटक केली होती. तिथे असलेल्या तीन महिलांची सुटका केली. त्यांच्या चौकशीत त्यांना झपटप पैशांचे आमिष दाखवून या सेक्स रॅकेटमध्ये आणण्यात आल्याचे उघडकीस आले होते. ग्राहकांकडून मिळणार्या पैशांतून त्यांना काही रक्कम कमिशन म्हणून दिली जात होती, उर्वरित रक्कम संबंधित आरोपी घेत होते.
तपासात आलेल्या या माहितीनंतर अटक आणि पाहिजे आरोपी आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सुटका केलेल्या तिन्ही महिलांना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. अमरीन सध्या पोलीस कोठडीत असून तिच्या इतर तीन सहकारी आलम, मुस्कान आणि टी नोसेने यांचा पोलीस शोध घेत आहेत.