अंधेरीतील दोन डान्स बारवर पोलिसांचा छापा

२८ जणांवर कारवाई तर तेरा बारबालांची सुटका

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – डान्स बारचा परवाना नसताना रात्री उशिरापर्यंत बारबालांना ग्राहकासोबत अश्‍लील नृत्य करण्यास प्रवृत्त करणार्‍या दोन डान्स बारवर गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाचया अधिकार्‍यांनी छापा टाकून कारवाई केली. त्यात बारच्या मालकासह कॅशिअर, वेटर, ऑर्केस्ट्रा कलाकार आणि ग्राहक अशा २८ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना पुढील चौकशीसाठी नंतर अंधेरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी दोन्ही बारमधून पोलिसांनी तेरा बारबालांची सुटका केली आहे. अटकेनंतर सर्व आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

मुंबईतील काही बार ऍण्ड रेस्ट्रारंट मालकांकडे डान्स बारचा परवाना नसताना ते अनधिकृतपणे रात्री उशिरापर्यंत बारबालांना बारमध्ये कामाला ठेवून त्यांना ग्राहकांसोबत अश्‍लील कृत्य करण्याय प्रवृत्त करत असल्याच्या काही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाले होते. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अशा बार ऍण्ड रेस्ट्रारंटवर कारवाईचे आदेश अंमलबजावणी विभागाला दिले होते. या आदेशानंतर २७ सप्टेंबरला रात्री उशिरा अंधेरीतील आंबेवाडी, आर. के सिंग मार्ग, हरिओम इमारतीच्या तळमजल्यावरील साईप्रसाद-क्लासिक नावाच्या बारमध्ये पोलिसांची छापा टाकला होता. या कारवाईत बारमध्ये असलेल्या पाच बारबालांची पोलिसांनी सुटका केली तर बारचा चालक-मॅनेजर, कॅशिअर, वेटर, ऑर्केस्ट्रा कलाकार आणि तीन ग्राहक अशा आठजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या कारवाईत पोलिसांनी तेरा हजाराची कॅशसहीत इतर मुद्देमाल जप्त केला होता.

या कारवाईपूर्वी याच पथकाने अंधेरीतील सहार रोड, चकाला, कुलसूमबाई कंपाऊंड, सिगारेट फॅक्टरीसमोरील मानसी बारवर कारवाई करण्यात आली होती. यावेळी बारच्या चालकासह कॅशिअर, पाच वेटर, ऑर्केस्टा कलाकार आणि वीस ग्राहक अशा वीसजणांवर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी बारमध्ये उपस्थित असलेल्या आठ बारबालांची सुटका केली. या दोन्ही बारमध्ये डान्स परवाना नव्हता. तरीही तिथे डान्स बार सुरु असल्याचे कारवाईदरम्यान उघडकीस आले. या छाप्यात पोलिसांनी वीस हजाराची कॅशसहीत इतर मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही कारवाईनंतर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना अंधेरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page