मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२४
मुंबई, – तेरा व पंधरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर त्यांच्या परिचित आरोपीने लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार कुर्ला आणि कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी प्रियकराला विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली तर सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला कांदिवली पोलिसांनी डोंगरी बालसुधारगृहात पाठविले आहे.
तक्रारदार महिला ही कुर्ला येथे राहत असून तिची पिडीत पंधरा वर्षांची मुलगी आहे. आरोपी कार्तिक हा तिचा मित्र असून त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर १५ मे ते १३ जुलै २०२४ या कालावधीत जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्याने तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ मोबाईलवर काढले होते. तेच फोटो आणि व्हिडीओ दाखवून तो तिला ब्लॅकमेल करुन तिच्यावर सतत लैगिंक अत्याचार करत होता. तिने नकार दिल्यास मारहाण करत होता. त्याच्याकडून होणार्या लैगिंक अत्याचारासह मारहाणीला कंटाळून तिने त्याच्याशी असलेले संंबंध तोडून टाकले होते. त्याचा राग आल्याने त्याने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला होता. तिने विनोबा भावे नगर पोलिसांना घडलेला प्रकार कार्तिकविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला शनिवारी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
दुसरी घटना कांदिवली परिसरात घडली. तेरा वर्षांची पिडीत मुलगी तिच्या पालकांसोबत कांदिवली परिसरात राहते. सोळा वर्षांचा आरोपी तिच्या परिचित असून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. २४ सप्टेंबरला ती मुलगी तिच्या घरी होती. यावेळी तिच्या घरी आरोपी आला आणि त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार सोमवारी तिच्याकडून तिच्या आईला समजताच तिने कांदिवली पोलिसांत सोळा वर्षांच्या आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्याने त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.