मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२४
मुंबई, – ग्रँटरोड येथे चालणार्या एका सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत एका मॅनेजरसह वेश्यादलाल अशा दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही डी. बी मार्ग पोलिसांना पुढील कारवाईसाठी सोपविण्यात आले होते. रविंद्रकमार जादू जाधव अणि चंद्रशेखर गवी गौडा अशी या दोघांची नावे असून यातील रविंद्रकुमार हा मॅनेजर तर चंद्रशेखर हा वेश्यादलाल आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितेसह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत नऊ महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना मानुखर्दच्या नवजीवन महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
ग्रँटरोड येथील लॅमिग्टन रोड, शामराव विठ्ठल मार्गावरील रेळे दिनेश इमारतीमध्ये सेक्स रॅकेट चालविला जात असल्याची माहिती अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे बोगस ग्राहकाच्या मदतीने शहानिशा केली होती. त्यात काही महिलांना डांबून ठेवून तिथे येणार्या ग्राहकांसोबत महिलांना जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा या पथकाने रेळे दिनेश इमारतीच्या तळमजल्यावरील रुम क्रमांक तीनमध्ये छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी रविंद्रकुमार या मॅनेजरसह वेश्यादलाल आणि त्याचा सहकारी चंद्रशेखर या दोघांना ताब्यात घेतले होते.घटनास्थळाहून पोलिसांनी नऊ महिलांची सुटका केली होती. त्यांच्या चौकशीतून तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींनी त्यांना तिथे डांबून ठेवून त्यांना ग्राहकांसोबत जबदस्तीने वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात होते. याच गुन्ह्यांत नंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध १४३ (३), ३ (५) भारतीय न्याय सहिता सहकलम ३, ४, ५, ७ (१), (ब) अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. मेडीकलनंतर सर्व महिलांना नवजीवन महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.