ऐंशी वर्षांच्या वयोवृद्धाकडून मुलाची चाकूने भोसकून हत्या
दारुसाठी पैशांची चोरी केली म्हणून हत्या झाल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – ऐंशी वर्षांच्या एका वयोवृद्धाने त्याच्याच ३५ वर्षांच्या मुलाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना दादर परिसरात उघडकीस आली आहे. अन्वर युवराज काळे असे हत्या झालेल्या मुलाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी युवराज दत्तू काळे याला दादर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने शनिवार ५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना रविवारी पहाटे पाच वाजता दादर येथील गोखले रोड, सॅल्वेशन शाळेजवळ घडली. युवराज काळे हे मूळचे संभाजीनगर, गंगापूर, लातून रेल्वे स्थानक परिसरात राहत असून अन्वर हा त्यांचा मुलगा आहे. अन्वर हा काहीच कामधंदा करत नाही. तो नेहमी संभाजीनगर येथून पळून जात होता. काही दिवसांपूर्वी तो संभाजीनगर येथून पळून मुंबईत आला होता. ही माहिती युवराजला समजताच ते त्याला घेण्यासाठी आले होते. रविवारी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. याच वादानंतर त्याने त्यांच्या मुलावर चाकूने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी युवराज काळे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना युवराज हा पोलीस ठाण्यात आला आणि त्यानेच त्याच्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला शनिवार ५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या चौकशीत अन्वर हा मुंबईत आल्यानंतर त्याच्या मागे युवराज काळे मुंबईत आला होता. शनिवारी या दोघांची दादर येथे भेट झाली होती. त्यानंतर युवराजने अन्वरसोबत मद्यप्राशन केले होते. काही वेळानंतर युवराज हा रस्त्याच्या बाजूला झोपला होता. अन्वरला आणखीन दारु प्यायची होती, त्यामुळे त्याने त्याचे वडिल युवराजच्या खिशातून पैसे चोरी केले होते. हा प्रकार नंतर त्याच्या लक्षात येताच त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. याच वादातून त्याने त्याची चाकूने भोसकून हत्या केली होती. हत्येनंतर त्याने स्वत पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते.