तीन वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणार्या पित्याला अटक
दहिसर येथे नात्याला काळीमा फासणार्या घटनेने संताप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – तीन वर्षांच्या मुलीला मारहाण करुन तिच्या पित्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची नात्याला काळीमा फासणार्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच ३२ वर्षांच्या आरोपी पित्याला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
२७ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या आरोपी पतीसह तीन वर्षांच्या मुलीसोबत दहिसर परिसरात राहते. तिचा पती पेंटर म्हणून काम करतो. शनिवारी दुपारी तीन वाजता ही मुलगी घरी होती. यावेळी तिच्याच वडिलांनी तिला मारहाण करुन तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर तिने कपड्यामध्ये हात घालून तिच्याशी अश्लील चाळे केले होते. तिच्या ओठावर जोरात किस करुन तिचा लैगिंक छळ केला होता. हा प्रकार नंतर त्याच्या पत्नीला समजताच तिने तिच्या पतीविरुद्ध दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता, पोक्सो आणि अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीस सोमवारी रात्री उशिरा त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
केईएम हॉस्पिटलमध्ये पाच वर्षांच्या मुलीचा विनयभंग
दुसरी घटना केईएम हॉस्पिटलच्या वार्ड क्रमांक तेरासमोरील मोकळ्या जागेत घडली. ५२ वर्षांची तक्रारदार महिला साकिनाका परिसरात राहत असून पिडीत तिची पाच वर्षांची नात आहे. सोमवारी दुपारी ती तिच्या आजीसोबत केईएम हॉस्पिटलमध्ये आली होती. यावेळी वार्ड क्रमांक तेरासमोरील मोकळ्या जागेत इरफान नावाच्या एका २४ वर्षांच्या तरुणाने तिला मांडीवर बसवून जबदस्तीने चायनीस खाण्यासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने तिच्या आजीने त्याच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच इरफानला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.