बॅकॉंकहून आणलेल्या उच्च प्रतीच्या गांजासह प्रवाशाला अटक
आंतरराष्ट्रीय विमानतळावर १.३४ कोटीचा गांजाचा साठा जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बँकॉंकहून आणलेल्या उच्च प्रतीच्या विदेशी गांजासह एका प्रवाशाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी १ कोटी ३४ लाखांचा गांजाचा साठा जप्त केला आहे. प्रवाशिविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सोमवारी बँकॉंकहून काहीजण ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती कस्टम अधिकार्यांना मिळाली होती. त्यामुळे बँकॉकहून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची झडती घेण्यात येत होती. ही कारवाई सुरु असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावर संशयास्पद फिरणार्या एका प्रवाशाला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होतै. त्याच्या बॅगेत या अधिकार्यांना १३४६ ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा गांजाचा साठा सापडला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १ कोटी ३४ लाख रुपये इतकी आहे. या प्रवाशाने अत्यंत कल्पेतेने हा साठा व्हॅक्यूम-सीलबंद पॅकेटमध्ये पॅक करुन आणले होते. त्यानंतर ते पॅकेट खाद्यपदार्थाच्या पॅकेटमध्ये लपविले होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने ते पॅकेट नंतर ट्रॉली बॅगेत ठेवले होतेे. मात्र त्याच्यावर संशय आल्याने त्याला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले आणि गांजा तस्करीचा पर्दाफाश केा. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवनू नंतर त्याला अटक करण्यात आली. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.