३१ लाखांच्या हिर्यांच्या अपहारप्रकरणी दलालास अटक
दोन उलटूनही हिरे किंवा पेमेंन न करता पलायन केले होते.
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सुमारे ३१ लाखांच्या हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी दिशील विजयभाई किकाणे या हिरे दलालास बीकेसी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला वांद्र येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दिड ते दोन वर्षांपूर्वी क्रेडिटवर घेतलेले हिरे परत न करता किंवा हिर्यांचे पेमेंट न देता दिशील किकाणे हा पळून गेला होता. मात्र गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करणयात आली आहे.
निकुंज नरशीभाई गोटी हे मिरारोड येथे राहत असून त्यांची त्रुशा जेम्स नावाची एक खाजगी कंपनी आहे. याच कंपनीत ते संचालक म्हणून काम असून कंपनीचे वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्स परिसरात एक कार्यालय आहे. ही कंपनीत हिर्यांचे खरेदी-विक्रीचे काम करते. याच ठिकाणी दिक्षील किकाणे हा हिरे दलाल म्हणून काम करतो. गेल्या सात वर्षांपासून ते दिक्षीलला ओळखत असून त्याच्यासोबत त्यांनी अनेकदा हिर्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. दिलेल्या मुदतीत त्याने हिर्यांचे पेमेंट केल्याने त्यांना त्याच्यावर विश्वास होता. सप्टेंबर २०२१ रोजी तो त्यांच्या कार्यालयात आला होता. त्याच्याकडे हिरे खरेदी करणारा चांगला व्यापारी असून त्याला मोठ्या प्रमाणात हिर्यांची गरज आहे असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला ३१ लाख २८ हजार ६४० रुपयांचे ९७ कॅरेटचे हिरे क्रेडिटवर दिले होते. दहा दिवसांत हिरे किंवा पेमेंट करण्याचे त्याने त्यांना आश्वासन दिले होते.
मात्र एक महिना उलटूनही त्याने त्यांना हिरे किंवा पेमेंट केले नाही. त्यामुळे त्यांनी त्याला पेमेंटसाठी संपर्क साधला होता, मात्र तो प्रत्येक वेळेस विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. दिड-दोन वर्ष उलटूनही त्याने क्रेडिटवर घेतलेले हिरे परत नाही किंवा हिर्याच्या विक्रीतून आलेले पेमेंट केले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दिक्षील किकाणे याला तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याने अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.