माहीम येथे अल्पवयीन मुलीने तर पवईत तरुणाची आत्महत्या

राहत्या घरी गळफास घेऊन दोघांनीही जीवन संपविले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – माहीम येथे आजारामुळे आलेल्या नैराश्यातून सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने तर पवई येथे एका २३ वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोघांनीही त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. याप्रकरणी माहीम आणि पवई पोलिसांनी दोन स्वतंत्र एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

सतरा वर्षांची मृत मुलगी ही तिच्या कुटुंबियांसोबत माहीम परिसरात राहते. तिला गेल्या दोन वर्षांपासून डिप्रेशनचा आजार होता. या आजारामुळे तिला अधूनमधून ऍटक येत होते. त्यामुळे तिची प्रकृती प्रचंड बिघडली होती. तिच्यावर भायखळा येथील मसीना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र या उपचारातून तिला काही प्रतिसाद मिळत नव्हता. शुक्रवारी तिचे अचानक खूप दुखू लागले होते. त्यामुळे तिने तिच्या बहिणीला हॉस्पिटलला जाऊ असे सांगितले. त्यामुळे तिच्या बहिणीने तिला तयारी करण्यास सांगून ही माहिती तिच्या दुसर्‍या बहिणीला सांगितली. घरी आल्यानंतर तिला तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच माहीम पोलिसांनी तिला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आजाराला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

दुसरी घटना पवईतील चैतन्यनगरात घडली. श्रेयस दिलीप कल्हापुरे हा तरुण मूळचा अहमदनगरचा रहिवाशी आहे. तो पवईतील एका खाजगी बँकेत कामाला होता. मुंबईत कायमस्वस्पी घर नसल्याने तो त्याच्या काही मित्रांसोबत एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. गुरुवारी घरात कोणीही नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रात्री रात्री हा प्रकार घरी आलेल्या मित्रांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही माहिती पवई पोलिसांना दिली होती. श्रेयसच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. मात्र त्याने त्याच्या मित्रांना मॅसेज पाठवून पैशांची मागणी केली होती. त्याला पैशांची गरज होती, मात्र कशासाठी त्याने पैशांची मागणी केली याचे कारण समजू शकले नाही. त्याच्या आत्महत्येची माहिती त्याच्या अहमदनगर येथे राहणार्‍या कुटुंबियांना देण्यात आली होती. या दोन्ही घटनेनंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र एडीआरची नोंद केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page