मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राज्यातील दहा आयपीएस अधिकार्यांच्या सोमवारी बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यात दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि आठ पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांचा समावेश आहे. उत्तर प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून अभिषेक त्रिमुखे यांची नियुक्ती करण्यात आली तर त्यांची जागी असलेल्या राजीव जैन यांची राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांची राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस उपमहानिरीक्षक, सशस्त्र विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांची उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, बंदर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर आणि परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांची महाराष्ट्र सायबर सेलच्या पोलीस अधिक्षक, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांची अनुसुचित जाती-जमाती आयोगाच्या पोलीस अधिक्षक, नागपूरच्या राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांची पुणे पोलीस उपायुक्त, ठाणे शहराचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांची ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक आणि वाशिमचे अप्पर पोलीस अधिक्षक भरत तांगाडे यांची ठाण्याच्या अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल लोखंडे यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या बदलीचे आदेश नंतर दाखविले जाणार आहे.