मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – चालू वर्षांत पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीसह गहाळ झालेले २०४ मोबाईल हस्तगत करण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. एका कार्यक्रमांत ते मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. चोरीसह गहाळ झालेले परत मिळाल्याने या मोबाईलधारकांनी पवई पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. जानेवारी ते ऑक्टोंबर महिन्यांत पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल झाले होते. मोबाईल चोरीच्या या वाढत्या तक्रारीची पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत सिंह दहिया, पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत बांगर यांंनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांना अशा मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक गणेश पाटील, जयदीप गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड, पोलीस हवालदार तानाजी टिळेकर, बाबू येडगे, चव्हाण, आदित्य झेंडे, पोलीस शिपाई संदीप सुरवाडे, पाटील, सूर्यकांत शेट्टी, साटम, प्रशांत धुरी, कुंदे यांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच गेल्या दहा महिन्यांत मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत ४० हून अधिक आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून या पथकाने अटक केली होती.
या आरेापींच्या चौकशीतून मोबाईल चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. त्यांच्याकडून आतापर्यंत पोलिसांनी २०४ चोरीसह गहाळ झालेले मोबाईल जप्त केले आहे. पाच हजारापासून पन्नास हजार रुपयांचे जप्त केलेल्या मोबाईलची किंमत आहे. या मोबाईलधारकांचा शोध घेऊन ते मोबाईल एका कार्यक्रमांत त्यांना परत करण्यात आले आहे. मोबाईल परत मिळाल्याने अनेकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे व त्यांच्या पथकाचे विशेष आभार व्यक्त केले होते.