योगा प्रशिक्षक महिलेच्या विनयभंगप्रकरणी हाडवैद्याला अटक

मालिश करताना अश्‍लील चाळेसह संभाषण केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – योगा प्रशिक्षक असलेल्या एका ३४ वर्षांच्या विनयभंगप्रकरणी रईस रमजान अहमद या ३६ वर्षांच्या हाडवैद्याला दहिसर पोलिसांनी अटक केली. बॅकपेनचा त्रास असल्याने रईसकडे आलेल्या या महिलेवर मालिश करताना त्याने तिच्याशी अश्‍लील चाळेसह संभाषण केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने २४ ऑक्टोंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

३४ वर्षांची तक्रारदार महिला ही दहिसर येथे राहत असून ती योगा प्रशिक्षक म्हणून काम करते. तिच्या पतीचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपासून तिला पायासंबंधी काही दुखणे सुरु होते. त्यामुळे ती तिच्या परिचित दहिसर येथील रावळपाडा, हंसराज पाल चाळीतील हाडवैद्य रईस अहमद याच्याकडे जात होती. त्याच्याकडे तिचे पती, सासू आणि मुलेही जात होते. त्यामुळे त्याच्यावर त्यांच कुटुंबियांचा विश्‍वास होता. मंगळवारी ८ ऑक्टोंबरला तिला बँकपेनचा त्रास होऊ लागल्याने ती सायंकाळी सात वाजता रईस अहमद याच्याकडे गेली होती. यावेळी त्याने तिच्या पाठीवर मालिश करुन तिच्या पाठीमध्ये गॅप असल्याचे सांगितले. मालिश करुन त्याने तिला दुसर्‍या दिवशी पुन्हा बोलाविले होते. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी ती पुन्हा त्याच्याकडे गेली होती. यावेळी मालिश करताना त्याने तिची लेगिन्स खाली केली. तिने त्याला विचारणा केली असता त्याने तुमची मानेपासूनची नस पायासचे ऍकलपर्यंत दबली असल्याने त्याला मालिश करायचे आहे असे सांगितले. मात्र तिने तिच्या पायाला काहीही दुखापत नसल्याचे सांगितले. यावेळी त्याने मी डॉक्टर असून माझ्या उपचारावर विश्‍वास ठेवा असे सांगितले. काही वेळानंतर त्याने तिची लेगिन्स खाली ओढून तिच्या प्रायव्हेट भागावर अश्‍लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. त्यामुळे ती घाबरुन त्याच्याकडे पाहू लागली. यावेळी रईसने त्याची पॅण्ड काढून नग्नावस्थेत तिच्याकडे पाहून मला एक चान्स दे असे अश्‍लील संभाषण करुन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. घडलेला प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तेथून रडत निघून गेली.

घडलेला प्रकार तिने तिच्या पतीला सांगितला. तिचे पती हिमाचल प्रदेशात असल्याने त्यांनी तिला मुंबईत आल्यानंतर आपण जाब विचारु असे सांगिले. त्यानंतर तिने हा प्रकार तिच्या भावासह शेजारी राहणार्‍यांना सांगितला. त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगून रईस अहमदविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ७४, ७५, ७६, ७९ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रईसला शनिवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला २४ ऑक्टोंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रईसच्या क्लिनिकमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा असल्याने गुरुवार १० ऑक्टोंबरचे सीसीटिव्ही फुटेज पोलीस ताब्यात घेणार आहे. रईसने अशाच प्रकारे उपचाराच्या नावाने काही महिलांशी अश्‍लील वर्तन करुन त्यांचा विनयभंग केला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page