झिशान सिद्धीकी हेदखील होते मारेकर्‍याच्या रडारवर?

बाबा सिद्धीकी यांच्यासह झिशानची केली होती रेकी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर आता त्यांचे आमदार पूत्र झिशान सिद्धीकी हेदेखील बिष्णोई टोळीच्या रडारवर होते अशी चर्चा सुरु आहे. अटकेत असलेल्या दोन्ही मारेकर्‍यांनी बाबा सिद्धीकी यांच्यासोबत झिशान सिद्धीकी यांचीही रेकी केल्याची कबुली दिली आहे. मात्र या वृत्ताला मुंबई पोलिसाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. मात्र झिशान सिद्धीकी हे मारेकर्‍यांच्या रडारवर होते की नाही याचा पोलिसांकडून तपास सुरु केल्याचे सांगणयात आले. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले होते. या तिघांमध्ये गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप आणि प्रविण लोणकर यांचा समावेश असून ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसाकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले असून या चौकशीतून आलेल्या माहितीवरुन इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बाबा सिद्धीकी मारेकर्‍यांच्या रडार होते. मात्र त्याचबरोबर मारेकर्‍यांनी झिशान सिद्धीकी यांचीही रेकी केल्याची कबुली दिली होती. त्यामुळे बाबा सिद्धीकी यांच्यासह झिशान सिद्धीकी हेदेखील त्यांच्यावर रडारवर होते का याचा गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. याबाबत मुंबई पोलिसाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. मात्र ही शक्यता पोलिसांनीही नाकारली नाही. चौकशी सुरु असल्याने आताच याबाबत काहीही सांगणे उचित ठरणार नाही असे पोलिसांनी सांगितले.
हत्येमागे बिष्णोई टोळीची दशहत निर्माण करण्याचा उद्देश
सिद्धीकी पिता-पूत्रावर हल्ला करुन त्यांना बिष्णोई टोळीची दहशत निर्माण करायची होती. सिनेअभिनेता सलमान खान याच्या घरासमोर गोळीबार केल्यानंतर त्यांना मुंबई शहरात मोठा धमाका करायचा होता. त्यामुळे बिष्णोईने बाबा सिद्धीकी आणि झिशान सिद्धीकी यांना टार्गेट केले होते. मात्र गोळीबारापूर्वी झिशानला एक कॉल आला आणि तो बाजूला गेला होता. त्यामुळे तो थोडक्यात बचावला. मात्र याच दरम्यान मारेकर्‍यांनी बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार केला होता. आरोपींच्या चौकशीतून या कटात कोण-कोण सामिल होते, प्रत्येकाने काय भूमिका निभावली होती याचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आले असून पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे पंधराहून अधिक टिम विविध राज्यात रवाना झाले आहेत. याबाबत मुंबई पोलिसाकडून लवकरच अधिकृत माहिती जारी केली जाणार असल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page