मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – व्हेकेशन सुट्टीसाठी मावशीच्या घरी आलेल्या एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मावशीच्या पतीनेच लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या काकाविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पिडीत मुलगी ही पंधरा वर्षांची असून ती व्हेकेशन सुट्टीसाठी तिच्या घाटकोपर येथे राहणार्या मावशीकडे राहण्यासाठी आली होती. १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत तिच्या मावशीचा पतीने तिला अनेकदा मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ दाखविले होते. ते व्हिडीओ दाखवून तो तिच्या प्रायव्हेट पार्टला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग करत होता. याच दरम्यान त्याने तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. भीतीसह बदनामीमुळे हा प्रकार तिने कोणालाही सांगितला नव्हता. अलीकडेच या मुलीची समोपदेशक असलेल्या महिलेची आपलुकीने चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान तिने हा प्रकार तिला सांगितला होता. त्यानंतर या महिलेने घाटकोपर पोलिसांना हा प्रकार सांगून पिडीत मुलीच्या काकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३७६ (२), (आय), ३७६ (२), (एफ) भादवीसह ४ (२), ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. या गुन्ह्यांत अद्याप अटकेची कारवाई झाली नसून त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. आरोपीची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
लैगिंक अत्याचारप्रकरणी अल्पवयीन मुलाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी
दुसर्या घटनेत एका चौदा वर्षांच्या मुलीवर तिच्याच परिचित पंधरा वर्षांच्या मुलाने लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी मुलाला डोंगरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. वांद्रे येथे राहणार्या तक्रारदार महिलेची पिडीत मुलगी असून ती एका खाजगी शाळेत शिकते. तिच्याच वर्गात आरोपी शिकत असून त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्याचे मोबाईलवर व्हिडीओ शूटींग केले होते. ते व्हिडीओ दाखवून तो तिला त्याच्यासोबत शारीरिक संंबंध ठेवण्याची धमकी देत होता. तसे केले नाहीतर तिचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकीच त्याने तिला दिले होते. ही माहिती मुलीकडून समजताच तक्रारदार महिलेने वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले. आरोपी हादेखील वांद्रे परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.