मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करणार्या तिन्ही मारेकर्यांनी गोळीबार करण्यापूर्वी गोळीबाराचा कसून सराव केल्याची कबुली देताना यूट्यबवरील व्हिडीओ पाहिल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. मुंबई-पुणे येथे मॅगझीनशिवाय आम्ही गोळीबाराचा सराव केला आणि काम फत्ते केल्याचे दोन्ही आरोपींनी आपल्या जबानीत म्हटले आहे.
१२ ऑक्टोंबरला बाबा सिद्धीकी यांची त्यांच्याच आमदार पूत्र झिशान सिद्धीकी याच्या कार्यालयबाहेर तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. त्यात छातीत तीन गोळ्या लागल्याने बाबा सिद्धीकी यांचा मृत्यू झाला होता. या गोळीबारानंतर तिन्ही मारेकरी पळून गेले, मात्र पळून जणार्या गुरमेल बलजीत सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोघांना पोलिसांनी पाठलाग करुन शिताफीने अटक केली तर त्यांचा तिसरा सहकारी शिवकुमार गौतम हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. याच गुन्ह्यांत दोन्ही मारेकरी पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. आपल्या चौकशीत या दोघांसह शिवकुमार गौतम याच्यावर बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश आले होते. त्यासाठी या तिघांनी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून काही दिवस कसून सराव केला होता. पुण्यासह मुंबईत आल्यानंतर काही दिवस ते सतत मॅगझिनशिवाय गोळीबाराचा सराव करत होते.
गोळीबारानंतर पळून जाण्याची त्यांची योजना तयार होती, मात्र पळून जाताना तीनपैकी दोनजण पकडले गेले तर शिवकुमार हा पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. बाबा सिद्धीकी हेच टार्गेट असल्याने त्यांचा फोटो आणि बॅनरचे फोटो मारेकर्यांना देण्यात आले होतै. त्यानंतर या तिघांनी बाबा सिद्धीकी यांच्यासह त्यांचा आमदार पूत्र झिशान सिद्धीकी यांची सलग २५ दिवस रेकी केली होती. त्यात घरासह त्यांच्या कार्यालयाचा समावेश होता असेही अटकेत असेलल्या दोन्ही मारेकर्यांनी कबुली दिली आहे. पळून जाताना त्यांनी एक पिस्तूल फेकून दिली होती. ही पिस्तूल व एक आधारकार्ड नंतर पोलिसांनी जप्त केली आहे.