मॉर्फ अश्लील फोटो पाठवून महिलेची बदनामीचा प्रयत्न
आर्थिक वादातून घडलेला प्रकार; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – पवईतील एका खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणार्या महिलेचे तिच्या मित्रांसोबतचे अश्लील मॉर्फ पाठवून बदनामीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित व्यक्तीने तिच्या मित्रांकडून घेतलेल्या पैशांवरुन तिला शिवीगाळ करुन धमकी दिली होती. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय सहितासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
३६ वर्षांची तक्रारदार महिला ठाणे येथे राहत असून ती पवईतील एका खाजगी कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नोकरी करते. याच कंपनीत तिचा मित्र टेक्निशियन म्हणून कामाला असून तो नेहमी फिल्ड वर्कसाठी बाहेर असतो. ७ ऑक्टोंबरला ती तिच्या ऑफिसमध्ये काम करत होती. सकाळी पावणेदहा वाजता तिला एका अज्ञात व्हॉटअप क्रमांकावर एक फोटो आला होता. तो फोटो तिच्या मित्राचा होता. त्याचा मॉर्फ केलेला अश्लील पाठवून तिला पाठविण्यात आला होता. त्यात एक ऑडिओ मॅसेज होता. त्यात संबंधित व्यक्तीने तिच्या मित्राने त्याच्याकडून पैसे घेतले आहे. ही रक्कम परत केली नाही त्याचे अश्लील मॉर्फ केलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तिला सतत वेगवेगळ्या मोबाईलवरुन कॉल येत होते. मात्र तिने ते कॉल घेतले नाही. याच दरम्यान तिला संबंधित व्यक्तीने तिच्यासह तिच्या मित्राचे अश्लील मॉर्फ केलेले फोटो पाठविले होते. तिला शिवीगाळ करुन त्याने पैशांवरुन तिला धमकी देण्याचा प्रयत्न केला होता.
या दोघांचे मॉर्फ अश्लील फोटो पाहून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यातच संबंधित व्यक्तीने तिला शिवीगाळ करुन धमक दिली होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार पवई पोलिसांना सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध ३५१ (२), ३५२ भारतीय न्याय सहिता सहकलम ६७, ६७ (अ) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.