सेवानिवृत्त झालेल्या पोलिसांचा पोलीस आयुक्तांकडून सन्मान
प्रशिक्षण पूर्ण करुन सेवेत रुजू झालेल्या पोलिसांसाठी मार्गदर्शन संवाद सत्र संपन्न
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ मार्च २०२४
मुंबई, – जवळपास ३२ ते ३६ वर्ष पोलीस दलाची अविरत सेवा करुन मुंबई रेल्वे पोलीस दलातून निवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. त्यांच्या कुटुुंबियांच्या उपस्थितीत हा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सेवेच्या शेवटच्या क्षणी बहुतांश अधिकारी आणि अंमलदार भाऊक झाल्याने त्यांना त्यांचे मनोगत मांडताना व्यक्त होताना अवघडल्यासारखे होते. ही बाब लक्षात घेऊन, त्यांच्या सेवा कर्तव्यप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रेल्वेचे पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी निवृत्ती नव्हे नवी आवृत्ती ही पुस्तिका दर महिन्यांत निरोप समारंभाचे वेळी तयार करुन ती उपस्थितांना वितरीत करण्यात आले. या पुस्तिकेतून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना आपल्या भावना व्यक्त करत असतात. गुरुवारी २९ घाटकोपर येथील रेल्वे पोलीस मुख्यालयातील नवरंग सभागृतात राखीव पोलीस निरीक्षक संजय यशवंत सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास उद्धव सोनावणे यांंचा सन्मान करुन त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी रेल्वेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शहाजी निकम यांनी निवृत्ती नव्हे नवी आवृत्ती या पुस्तिकेची माहिती उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्यांना करुन दिली.
पोलीस अधिकारी आणि अंमलदारासाठी मार्गदर्शन संवाद सत्र संपन्न
याच कार्यक्रमांत पोलीस प्रशिक्षण पूर्ण करुन मुंबई रेल्वे पोलीस दलात सामिल झालेले २१ नवीन प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक आणि ५८० पुरुष आणि महिला अंमलदारासाठी मार्गदर्शन संवाद सत्र संपन्न झाले. रेल्वे पोलीस दल, त्याची संरचना, कार्यक्षेत्र, कार्यपद्धत आणि रेल्वे पोलिसांसमोरील आवाहने, पोलीस ठाण्यातील दैनदिन कामकाज याबाबची माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शन व संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेल्वेचे पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी या अधिकारी आणि अंमलदाराचे स्वागत करुन अभिनंदन केले होते. पोलीस दलातील जबाबदारीचे कर्तव्य पार पाडताना वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य यांची कशी सांगड घालावी, भष्ट्राचारमुक्त पोलीस कर्तव्य, सामाजिक वांधिलकी, पोलिसांचे दायित्व, समाजप्रती सुदृढ दृष्टीकोन, तत्परता, सचोटी या विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. ज्ञानेश्वरीचे संदर्भ देऊन आयुष्यात कसे सकारात्मक बदल घडविता येऊ शकतात हे दाखवून दिले. उपस्थित सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमांची सांगता झाली.