मैत्री,,, गिफ्ट आणि धोका 

0
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ मार्च २०२४
मुंबई, : वृद्ध महिलाशी मैत्री करून त्याना महागडे गिफ्टच्या भूलथापा मारायच्या. भूलथापांना बळी पडल्यावर ते गिफ्ट विमानतळावर आले आणि पोलीस कारवाई करू नये असे भासवून पैसे उकळले जातात. अशाच प्रकारे दहिसर येथील वृद्ध महिलेची सायबर ठगाने फसवणूक केली. फसवणूकप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात सायबर ठग हे विविध आयडिया शोधून काढत नागरिकांची फसवणूक करतात. खासकरून ठग हे वृद्ध पुरुष आणि महिलांना टार्गेट करतात. पूर्वी लॉटरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या या सायबर ठगाने आता आपला मोर्चा गिफ्टच्या नावाखाली फसवणूक करण्याकडे वळवला आहे. दहिसर येथे एक वृद्ध महिला राहते. दोन वर्षांपूर्वी त्याची रॉनी नावाच्या व्यक्ती सोबत ऑनलाईन ओळख झाली होती. ओळखीनंतर त्याने मोबाईल नंबर शेअर केला. रॉनी ने तो लंडन येथे मुलीसोबत राहत एकटाच राहत असल्याचे भासवले. तर महिलेने देखील मुलगा आणि सुने सोबत राहत असल्याचे त्याला सांगितले. काही दिवसापूर्वी रॉनी ने महिलेला फोन केला. आपल्या मुलीचा वाढदिवस असल्याने काही गिफ्ट पाठवणार असल्याचे महिलेला भासवले. तसेच त्याने महिलेकडे गिफ्ट पाठवण्यासाठी पत्ता मागितला. सुरुवातीला गिफ्टसाठी महिलेने नकार दिला.
त्या घटनेनंतर दोन दिवसांनी महिलेला एका नंबरवरून फोन आला. तिने दिल्ली विमानतळावरून बोलत असल्याचे भासवले. दिल्ली विमानतळावर पार्सल आले असून त्यासाठी ३ लाख रुपये कर म्हणून भरावा लागेल असे सांगितले.
तेव्हा महिलेने आपण मुंबईचा पत्ता दिला असून ते पार्सल दिल्ली येथे कसे आले. तसेच कराच्या रूपात तीन लाख रुपये कशाला द्यायचे असे तिने प्रश्न त्या महिलेला विचारला. त्यानंतर महिलेने त्या पार्सल मध्ये ६ हजार पौंड ( परदेशी चलन) असल्याने तीन लाख रुपये कराच्या रूपात द्यावे लागतील असे तिला सांगितले. या घटनेनंतर महिलेला आणखी एका महिलेचा फोन आला. तिने देखील आपण कस्टम विभागातून बोलत असल्याचे भासवले. कर भरा आणि पार्सल घेऊन जा असे तिला सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन महिलेने पैसे भरले. पैसे भरल्यावर तिला रॉनी नावाच्या एकाने फोन केला. आपल्याला लंडन येथे पोलीस पकडणार आहेत. हे प्रकरण मिटवण्यासाठी ५५ हजार रुपयाची गरज आहे. आपण हिंदुस्थानात आल्यावर सर्व पैसे देऊन हे प्रकरण मिटवू असे तिला सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन महिलेने पैसे पाठवले. पैसे पाठवल्यावर त्याने रॉनी आणि दोन महिलांना मोबाईलवर संपर्क केला. तेव्हा त्याचा नंबर बंद येत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
काय काळजी घ्याल 
सायबर ठग हे सोशल मीडियावर वृद्ध असणाऱ्या महिलांचे प्रोफाइल शोधून काढतात. त्याना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. सुरुवातीला मैत्री करतात. मैत्री झाल्यावर महिला आपल्याकडे आकर्षित होते का हे पाहतात. तिला गिफ्टची पुडी सोडतात. महिलेने नकार दिल्यावर ठग हे तिला गिफ्ट घेण्यासाठी विनंती करतात. तिने होकार दिल्यावर तिच्याकडून पत्ता घेतात. तो पत्ता इंटरनेटवर शोधून काढतात. ती इमारत कशी आहे, तिचे राहते घराचे लोकेशन काय आहे यावरून ती किती पैसे देईल हे ठरवतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ठग महिलांना फोन करतात. तुमचे पार्सल आले आहे, त्यात परदेशी चलन आहे असे भासवून पैसे उकळतात.
पैसे पाठवण्यापूर्वी खबरदार 
अनेकदा ठगांचे साथीदार हे त्या गिफ्ट मध्ये महागडे चलन आहे असे भासवतात. ते कराच्या नावाखाली पैसे उकळण्यास सुरुवात करतात. ज्या व्यक्तींना आपण प्रत्यक्ष भेटलो नाही अशी व्यक्ती आपल्याला का महागडे गिफ्ट पाठवेल असा प्रश्न उपस्थित करणे गरजेचे आहे. ते गिफ्ट पाठवायचे असल्यास घरच्या पत्यावर थेट पाठवलतील विमानतळावर का ते पकडले जाईल हे देखील महत्वाचे आहे. जर तुम्हाला कोणी गिफ्टच्या नावाखाली फोन करत असल्यास त्याची माहिती जवळच्या पोलिसांना द्यावी. जेणे करून आपली फसवणूक होणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page