मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सांताक्रुज येथे दोन वेगवेगळ्या घटनेत तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाकोला आणि सांताक्रुज पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. यातील एका गुन्ह्यांतील आरोपीस वाकोला पोलिसांनी अटक केली तर दुसर्या गुन्ह्यांतील पळून गेलेल्या आरोपीचा सांताक्रुज पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पहिली घटना २३ आूक्टोंबरला सायंकाळी पाच ते सहा वाजता सांताक्रुज येथील मुक्तानंद गार्डनच्या गेटबाहेर घडली. ३७ वर्षांची तक्रारदार महिला ही सांताक्रुज येथे राहते. तिची आठ वर्षांची मुलगी असून ती सध्या साताक्रुज येथील एका शाळेत शिकते. बुधवारी २३ ऑक्टोंबरला सायंकाळी सात वाजता ही मुलगी तिच्या नऊ वर्षांच्या मैत्रिणीसोबत ट्यूशनवरुन घरी येत होती. यावेळी सांताक्रुज येथील मुक्तानंद गार्डन गेटबाहेर एका अज्ञात तरुणाने त्यांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर मागून दोन्ही मुलींना जोरात मिठी मारुन त्यांच्या पोटाला, छातीला आणि गळ्याला नकोसा स्पर्श करुन त्यांच्याशी अश्लील चाळे केले. त्यांच्याशी अश्लील संभाषण करुन त्याने दोन्ही मुलींचा विनयभंग केला होता. या प्रकारानंतर त्या दोघीनी आरडाओरड सुरु केला, यावेळी तो तरुण तेथून पळून गेला होता. घरी आल्यानंतर या दोघींनी हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर बळीत मुलीच्या आईने सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात तरुणाविरुद्ध तक्रार केली ोती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपी तरुणाचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसर्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला सांताक्रुज येथे राहत असून त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. शुक्रवारी सायंकाळी पावणेआठ वाजता ती शौचालयास गेली होती. यावेळी पाणी नसल्याने ती वरच्या मजल्यावर पाणी घेण्यासाठी गेली होती. तिथे शौचालयाची साफसफाई करणार्या ५१ वर्षांच्या आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी वाकोला पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली. बळीत मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांना ओळखत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले आहे.