मालाड-अंधेरी येथे चार व पंधरा वर्षांच्या दोन मुलींचा विनयभंग
चारही आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – अंधेरी येथे एका पंधरा वर्षांच्या मुलीचा पाठलाग करुन तसेच मालाडच्या मालवणीत परिसरात एकटी असलेल्या चार वर्षांच्या मुलीचा तिच्याच परिसरात आरोपीने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालवणी आणि सहार पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन पळून गेलेल्या चारही आरोपींचा शोध सुरु केला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या दोन्ही घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतााची लाट उसळली होती.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला अंधेरीतील मरोळ परिसरात राहते. तिची पंधरा वर्षांची असून ती सध्या शिक्षण घेते. सोमवारी रात्री नऊ वाजता ती अंधेरीतील मरोळ, पाईपलाईन सुविधा शाळेसमोरुन जात होती. यावेळी तिचा तीन अज्ञात तरुणाने पाठलाग केला होता. हा प्रकार तिच्या लक्षात येताच ती घाईघाईने घराच्या दिशेने जाण्यासाठी निघाली. काही वेळानंतर त्यापैकी एकाने तिला धक्का मारला आणि तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. तसेच इतर दोघांनी तिच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करुन तिला हाताने मारहाण केली होती. यावेळी तिने तिघांचा प्रतिकार करुन तेथून पळ काढला. घरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या तक्रारदार आईला सांगितला. त्यानंतर त्या दोघीही सहार पोलीस ठाण्यात गेला आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
दुसरी घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली. बळीत चार वर्षांची मुलगी असून तिच्या पालकांसोबत मालवणीतील गेट क्रमांक आठमध्ये राहते. सोमवारी रात्री दहा वाजता ती तिच्या घरी एकटीच होती. यावेळी तिच्या परिचित आरोपीने घरात घुसून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर तो तैथून पळून गेला होता. मुलीकडून ही माहिती मिळताच तिच्या आईने आरोपीविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही गुन्ह्यांतील चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.