आरोपीच्या अटकेसाठी रेल्वे पोलीस बनले पर्यटक

ड्रग्जच्या गुन्ह्यांतील मुख्य आरोपीस जम्मूत अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – चरसची तस्करी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला रेल्वे गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटने बेड्या ठोकल्या. सोनम बोध असे त्याचे नाव आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस जम्मूच्या कनोल येथे गेले. पर्यटक बनून तीन दिवस पोलिसांनी फिल्डिंग लावून सोनमला बेड्या ठोकल्या. 

गेल्या वर्षी मे महिन्यात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस हे मुंबई सेंट्रलच्या ब्रिजवर प्रवाशाच्या साहित्याची तपासणी करत होते. तपासणी दरम्यान एकाच्या बॅगेत चरस मिळून आले. चरस प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला. त्याचा तपास रेल्वे गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटला दिला. पोलिसांनी तपास करून गंतव्यकुमारला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत कॅर्रीचे नाव समोर आले. त्याला अटक केली. त्याच्या चौकशीत विकी कल्याणीचे नाव समोर आले. विकी हा पोलिसांना गुंगारा देत पळून जात होता. त्याला अटक केल्यावर त्याच्या चौकशीत सोनमचे नाव आले.  तपासा दरम्यान पोलिसांना सोनमची माहिती मिळाली. मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. विजय खेडकर याच्या पथकातील पोलीस निरीक्षक रोहित सावंत, भडाळे, काळे, बडेकर, रेडेकर आदीच्या पथकाने तपास सुरु केला. पोलिसांचे पथक कनोल येथे गेले. तेथे सावंत याचे पथक टुरिस्ट बनून तीन दिवस राहिले. पोलिसांनी तेथे चरस तस्कराची माहिती काढली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतले. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
 बॉक्स
दोन लाख रुपये होता फायदा 
सोनम हा पूर्वी चरसचे व्यसन करायचा. त्याची विकी सोबत ओळख झाली. विकी हा कनोल येथून एका कडून चरस घ्यायचा. त्याच्यासोबत वाद झाल्यावर विकीने सोनमला तस्करीची आयडिया दिली. त्यानंतर सोनम हा कनोल येथून चरस आणायचा. ते चरस तो ओळखीच्या पेडलरला देत असायचा. त्याच्या मोबदल्यात त्याला दोन लाख रुपये फायदा होत होता.
बॉक्स
पैसे गल्फ्रेंडवर उडवायचा 
सोनम हा काही महिन्यापासून चरसच्या तस्करीच्या धंद्यात आहे. चरस विक्रीतून त्याला झटपट पैसे मिळायचे. तो ते पैसे त्याच्या गल्फ्रेडवर उडवत असायचा. कनोल येथे सोनमच्या आईचे एक कॅफे आहे.लॉक डाऊन मध्ये नोकरी गेल्यानंतर झटपट पैशासाठी तो चरस तस्करी करू लागला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page