मुंबईतील अठरा सहाय्यक पोलीस आयुक्तांना नवीन पोस्टिंग
सोमवारी रात्री नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – अकरा वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ५२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे जारी केल्यानंतर आता मुंबईतील अठरा सहाय्यक पोलीस आयुक्तांना नवीन पोस्टिंग देण्यात आली आहे. सोमवारी रात्री संबंधित पोलीस अधिकार्याच्या बदल्याचे आदेश जारी करताना त्यांना त्यांच्या नवीन नियुक्त केलेल्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. या बारा पोलीस अधिकार्यांमध्ये मुंबईतील दहा तर इतर शहरातून मुंबईत बदली दाखविण्यात आलेल्या आठ पोलीस अधिकार्याचंा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी महाराष्ट्र पोलीस दलात सध्या बदल्याचे वारे वाहत आहेत. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात काही पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात मुंबईत आलेल्या ६३ पोलीस अधिकार्यांची सोमवारी रात्री बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात अकरा वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ५२ पोलीस निरीक्षकांचा समावेश होता. आता मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या दहा आणि मुंबईत बदली दाखविण्यात आलेले आठ अशा बारा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आले आहे. या अठरा पोलीस अधिकार्यांमध्ये कालिना सशस्त्र विभागाचे किशोर रामदास खैरनार यांची दहिसर विभाग, विशेष शाखा एकच्या प्राची विनायक कर्णे यांी विक्रोळी विभाग, गुन्हे शाखेचे दत्ता गणपत नाळे यांची वरळी विभाग, विशेष शाखा एकचे प्रकाश हिंदुराव चौगुले यांची खेरवाडी विभाग, गुन्हे सायबर शाखेचे आबूराव किसन सोनावणे यांची देवनार विभाग, विशेष शाखेचे एकचे कल्याण एकनाथ कर्पे यांची डी. एन नगर विभाग, मुख्यालयाचे अरुण रुक्माजी भोर यांची माहीम विभाग, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रविण विनायक तेजाळे यांची दादर विभाग, संरक्षण व सुरक्षा विभाागाचे शंकर प्रभाकर चिंदरकर यांची आग्रीपाडा विभाग, विशेष शाखा एकचे मोहम्मद युसूफ माजिद सौदागर यांची नेहरुनगर विभाग, ठाणे महामार्ग सुरक्षा पथकाचे विजय चिंतामण डोळस यांची पायधुनी विभाग, ठाण्याचे प्रदीप भिवसन मैराळे यांची साकिनाका विभाग, नाशिक पोलीस प्रशिक्षण केंद्राचे संदीप दौलत मोरे यांची मुलुंड विभाग, नाशिकचे रामराव त्र्यंबक ढिकले यांची चेंबूर विभाग, नवी मुंबईचे योगेश अशोकराव गावडे यांची माटुंगा विभाग, कोल्हापूरच्या प्रिया नानासाहेब पाटील यांची विशेष शाखा एक, गुन्हे अन्वेषण विभागाचे तन्वीर अहमद शेख यांची डोंगरी विभाग, रायगडचे धनश्याम विजय पलंगे यांची भोईवाडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
सात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या
मुंबईसह इतर ठिकाणाहून बदली करण्यात आलेल्या सात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांचीही मंगळवारी नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. त्यात मिरा-भाईंदर-वसई-विरारच्या राजू किसनराव माने यांची वनराई पोलीस ठाणे, राजेंद्र गणपतराव कांबळे यांची शिवडी पोलीस ठाणे, संजय दत्तू हजारे यांची साकिनाका पोलीस ठाणे, जितेंद्र बोदाप्पा व्हनकोटी यांची डोंगरी, नागपूरचे गजानन रमेश विखे यांची गोराई पोलीस ठाणे मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मिनाक्षी मनोज रोहरा यांची विलेपार्ले पोलीस ठाणे, नवी मुंबईच्या सुधाकर परबती ढाणे यांची ऍण्टॉप हिल पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
२१ पोलीस निरीक्षकाच्या नियुक्त्या
सोमवारी काही पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्याचे आदेश जारी करण्यात आले होते. मंगळवारी आणखीन २१ पोलीस निरीक्षकांच्या विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात मिरा-भाईंदर-वसई-विरारचे दिलीप हरिभाऊ राख यांची एमएचबी पोलीस ठाणे, सुधीर निवृत्ती गवळी यांची गोराई पोलीस ठाणे, सागर चंद्रकांत टिळेकर यांची डी. बी मार्ग पोलीस ठाणे,विजय सुकदेव पवार यांची शिवाजी पार्क पोलीस ठाणे, विलास सखाराम तुपे यांची भायखळा पोलीस ठाणे, लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे रमेश गोपीनाथ सोलापुरे यांची शिवाजीनगर पोलीस ठाणे, नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाचे विनोद हिरासिंग आडे यांची वाकोला पोलीस ठाणे, गुन्हे अन्वेषण विभागाच्या स्मिता विजयसिंह पाटील यांची देवनार पोलीस ठाणे, दौंड, नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या कविदास सुरेश जांभळे यांची खेरवाडी पोलीस ठाणे, प्रकाश विष्णू वाडकर यांची मानखुर्द पोलीस ठाणे,वैभव बाबूराव कणसे यांची आरएके मार्ग पोलीस ठाणे, विरेंद्र विष्णू चव्हाण यांची कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे, खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राचे रणजीत नारायण यमगर यांची मुख्य नियंत्रण कक्ष, विठ्ठल शंकर पवार यांची जोगेश्वरी पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर, गुन्हे अन्वेषण विभागाचे दिलीप बाळू तळपे यांची वाहतूक विभाग, भगवान नारायण बुरेसे यांची चुन्नाभट्टी पोलीस ठाणे, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या स्वाती अर्जुन डोके यांची विक्रोळी पोलीस ठाणे, सीमा सचिन गायकवाड यांची काळाचौकी पोलीस ठाणे, चंद्रशेखर पद्माकर हाडके यांची विशेष शाखा एक, अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे विजय रामचंद्र आढाव यांची एमएचबी पोलीस ठाणे, उदय अरुण सोयस्कर यांची सहार पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.