नऊ व चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार

कांदिवली-डोंगरीतील घटना; एकाला अटक दुसरा पळून गेला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – नऊ आणि चौदा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर त्यांच्याच परिचित तरुणाने तरुणांनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना कांदिवली आणि डोंगरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी डोंगरी आणि चारकोप पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून एका आरोपीस डोंगरी पोलिसांनी अटक केली तर दुसरा आरोपी गुन्हा दाखल होताच पळून गेला. पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी चारकोप पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.

३२ वर्षांची तक्रारदार महिला ही कांदिवलीतील चारकोप परिसरात राहत असून बळीत ही तिची नऊ वर्षांची मुलगी आहे. मोहम्मद राजा हा तिच्या परिचित राहत असून तोदेखील याच परिसरात राहतो. गणपतीच्या दिवशी बळीत मुलगी तिच्या घरी एकटीच होती. यावेळी त्याने घरात घुसून तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. शुक्रवारी ८ नोव्हेंबरला तो पुन्हा तिच्या घरी आला होता. घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने पुन्हा बळीत मुलीशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. नंतर तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर तिला मारण्याची धमकी दिली होती. घडलेला प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने चारकोप पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगून मोहम्मद राजाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. बळीत मुलीला मेडीकलसाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

दुसर्‍या घटनेत एका चौदा वर्षांच्या मुलीवर तिच्याच १९ वर्षांच्या मित्राने लैगिंक अत्याचार केल्याची घटना डोंगरी परिसरात घडली. १४ वर्षांची ही मुलगी डोंगरी परिसरात राहते. आरोपी तरुण हादेखील तिथेच राहत असून त्याचे पिडीत मुलीशी प्रेमसंबंध होते. २० ऑक्टोंबर ते ८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत त्याने तिला त्याच्या घरात बोलावून तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. दोन दिवसांपूर्वी तिच्या आईला मुलीच्या इंटाग्रामवर आरोपीसोबत तिचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे तिने तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने त्याचे आरेापीसोबत प्रेमसंबंध असून त्याच्या राहत्या घरी त्याने तिच्यावर दोन वेळा लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर पिडीत मुलीच्या आईने डोंगरी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page