शायनिंगमध्ये भरवेगात बाईक चालविणे मैत्रिणीच्या जिवावर बेतले

अपघातप्रकरणी २८ वर्षांच्या मित्राला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० नोव्हेंबर २०२४
मुंबई, – शायनिंगमध्ये भरवेगात बाईक चालविणे एका २५ वर्षांच्या तरुणीच्या जिवावर बेतल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली. अपघातात मेघा राजेंेद्र शहाणे या २५ वर्षीय वकिल तरुणीचा मृत्यू झाला. बाईक स्लीप होऊन खाली पडल्याने मागून येणार्‍या वाहनाच्या चाकाखाली आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी अपघाताची नोंद करुन तिचा मित्र इरफान अहमद रियाज अहमद खान (२८) याला अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

हा अपघात शुक्रवारी रात्री पावणेआठ वाजता घाटकोपर येथील ठाण्याकडे जाणार्‍या वाहिनीवर, विक्रोळी वाहतूक पोलीस चौकी ब्रिजवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. इरफान हा चेंबूरच्या रेतीबंदर रोड रोड क्रमांक सहा, नवभारत एसआरएचा रहिवाशी आहे. मेघा ही त्याची मैत्रिण असून ती वकिल म्हणून काम करत होती. शुक्रवारी सायंकाळी ती इरफानसोबत त्याच्या बाईकवरुन घाटकोपर येथून ठाण्याच्या दिशेने जात होती. यावेळी शायनिंगमध्ये बाईक चालविताना इरफानचा बाईकवरील नियंत्रण सुटले आणि विक्रोळी वाहतूक पोलीस चौकी ब्रिजवर त्याची बाईक स्लीप झाली होती. त्यामुळे ते दोघेही बाईकवरुन खाली पडले होते. यावेळी मागून येणार्‍या एका वाहनाच्या चाकाखाली आल्याने मेघा ही गंभीररीत्या जखमी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या मेघाला पोलिसांनी तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

याप्रकरणी पोलीस शिपाई अनिल पवार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी बाईकस्वार मित्र इरफान अहमद खानविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतच्या मैत्रिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच दुसर्‍या दिवशी इरफान हा स्वतहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page