बोगस ऍपच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगच्या नावाने फसवणुक
एक-दोन नव्हे तर तब्बल ११ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – शहरातील एका नामांकित कंपनीच्या बोगस ऍपच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ७५ वर्षांच्या वयोवृद्ध निवृत्त कॅप्टनची एक-दोन नव्हे तर तब्बल एकोणीस कोटीची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार कुलाबा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोन अज्ञात सायबर ठगाविरुद्ध दक्षिण प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. संबंधित कंपनीत जाऊन केलेल्या चौकशीनंतर फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
झकसीस कोसा वाडिया हे वयोवृद्ध तक्रारदार कुलाबा परिसरात राहत असून ते एका खाजगी कंपनीतून जहाजातून कॅष्टन म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी अनेकदा शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केली होती. त्यामुळे शेअर मार्केटसंदर्भातील सर्व माहिती जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात. ऑगसट महिन्यांत त्यांच्या व्हॉटअपवर मोतीलाल ओसवाल स्टॉकमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परवाता मिळेल अशी माहिती प्राप्त झाली होती. काही दिवसांनी त्यांना एक लिंक पाठविण्यात आली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांना मोतीलाल ओसवाल पीटीसी अकाऊंट नावाचे एक पेज ओपन झाले होते. या ग्रुपमध्ये त्यांच्यासह इतर सभासद होते. शेअरमार्केटसंदर्भात दैनदिन घडामोडीची ग्रुपमध्ये माहिती दिली जात होती. त्यात अनेकांनी गुंतवणुक केल्याचे तसेच त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परताता मिळत असल्याचे दिसून येत होते. याच दरम्यान त्यांना एका महिलेने संपर्क साधून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांनी संबंधित गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. यावेळी या महिलेच्या सांगण्यावरुन त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केले होते.
मात्र या बँक खात्याविषयी संशय निर्माण झाल्याने त्यांनी तिच्याकडे विचारणा केली होती. यावेळी तिने कंपनीला टॅक्स भरावा लागत असल्याने वेगवेगळ्या बँक खात्यात ही रक्कम घेऊन त्यांच्या नावाने कंपनीकडून गुंतवणुक केली जात असल्याचे सांगण्यात आले. तिच्यावर विश्वास त्यांनी ५ सप्टेंबर ते १९ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत शेअर ट्रेडिंगसाठी ११ कोटी १६ लाख ६१ हजार १६१ रुपयांची गुंतवणुक केली होती. ग्रुपच्या ऍपवर त्यांनी गुंतवणुक केलेली रक्कम आणि त्यातून त्यांना मिळणारा फायदा दिसत होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा झाल्याचे ऍपवरुन दिसत असल्याने त्यांनी त्यातील काही रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याची विनंती केली होती. यावेळी या महिलेने त्यांना वीस टक्के सर्व्हिस टॅक्स भरल्यानंतर ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी काही रक्कम तिने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. तरीही तिने त्यांच्या बँक खात्यात त्यांची मूळ रक्कमेसह प्राफिटची रक्कम ट्रान्स्फर केली नव्हती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी लोअर परेल येथील मोतीलाल ओसवाल कंपीत जाऊन विचारपूस केली असता त्यांना संबंधित कंपनीचे ऍप बोगस असल्याचे समजले होतै. त्यांच्यासह इतरांनी या ऍपच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली असून या सर्वांची फसवणुक झाल्याचे समजले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या महिलेसह दोघांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने कंपनीचे बोगस ऍपच्यामाध्यमातून त्यांना गुंतवणुक करण्यास करुन त्यांची सुमारे अकरा कोटीची फसवणुक केली होती. तसेच त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा होत असल्याचे बोगस आकडा दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे त्या सर्व बँक खात्याची माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली असून आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.