जादूटोणाचा बहाणा करुन सोळा वर्षांच्या मुलीचा विनयभंग
गुन्हा दाखल होताच ४७ वर्षांच्या टॅक्सीचालकास अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – जादूटोणा केल्याचा बहाणा करुन टॅक्सीत बसलेल्या एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार काळाचौकी परिसात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच जगन्नाथ दगडू काळे या ४७ वर्षांच्या आरोपी टॅक्सीचालकास काळाचौकी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
१६ वर्षांची बळीत मुलगी ही काळाचौकी परिसरात राहत असून ती एका नामांकित कॉलेजमध्ये शिकते. गुरुवारी सायंकाळी सव्वाचार वाजता ती कॉलेजला जाण्यासाठी अभ्युदयनगरातून टॅक्सीची वाट पाहत होती. यावेळी तिथे जगन्नाथ काळे आला. यावेळी कॉलेजला जायचे असल्याचे सांगून ती मागच्या सीटवर बसली. यावेळी त्याने तिचा हात पकडून तिच्यावर कोणीतरी जादूटोणा केला आहे. त्यामुळे त्याने तिला पुढच्या सीटवर बसण्यास सांगितले. याच दरम्यान त्याने तिच्या टी-शर्ट आणि पॅण्टवर हात टाकून तिला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिथे आरडाओरड सुरु केली होती. यावेळी तिथे असलेल्या लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
याप्रकरणी या मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. जगन्नाथ काळे हा नवी मुंबईतील कौपरखैरणेचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.