राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याच्या हत्येतील आरोपीवर मोक्का

न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघांची पुन्हा चौकशी होणार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ डिसेंबर २०२४
मुंबई, – ऑक्टोंबर महिन्यांत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे भायखळा विधानसभा मतदारसंघातील तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या हत्येतील तिन्ही आरोपीविरुद्ध अखेर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आनंदा अशोक काळे ऊर्फ अन्या, विजय ज्ञानेश्‍वर काकडे ऊर्फ पप्या आणि प्रफुल्ल प्रविण पाटकर अशी या तिघांची नावे असून ते तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे या तिघांचा ताबा घेऊन त्यांची पुन्हा चौकशी होणार आहे.

४ ऑक्टोंबरला घोडपदेव येथे सचिन कुर्मी यांची काही अज्ञात व्यक्तींनी तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. सचिन हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अजीत पवार गटाचे पदाधिकारी होते. त्यांच्यावर भायखळा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे या हत्येची वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत भायखळा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. हत्येचा गुन्हा दाखल होताच मारेकर्‍यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच आनंद काळे, विजय काकडे आणि प्रफुल्ल पाटकर या तिन्ही मारेकर्‍यांना काही तासांत पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून ताब्यात घेतले होते. चौकशीत या तिघांनीच संगनमत करुन सचिन कुर्मी यांची हत्या केल्याची कबुली दिली. त्यांच्यात पूर्ववैमस्न होते, त्याच्या रागातून सचिन यांची हत्या करुन ते तिघेही पळून गेले होते.

मात्र गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासांत पोलिसांनी हत्येचा पर्दाफाश करुन तिन्ही मारेकर्‍यांना अटक केली होती. एक आठवड्यानंतर या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हे शाखेने मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. अखेर सोमवारी तिन्ही आरोपीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविणयात आला आहे. या वृत्ताला पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दुजोरा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page