मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ डिसेंबर २०२४
मुंबई, – खाजगी क्लासवरुन घरी जाणार्या एका अल्पवयीन मुलीला पाहून अश्लील इशारे करुन तिचा विनयभग झाल्याचा प्रकार मरोळ मेट्रो रेल्वे स्थानकात घडला. याप्रकरणी या मुलीच्या तक्रारीवरुन अंधेरी पोलिसांनी आरोपीविरुद्घ विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मेट्रो रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने या आरोपीचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.
बळीत मुलगी ही अंधेरीतील मरोळ परिसरात राहत असून सध्या शिक्षण घेते. सोमवारी सायंकाळी ती पावणेपाच वाजता खाजगी क्लासवरुन घरी जात होती. वर्सोवा-घाटकोपर मेट्रोने मरोळ मेट्रो स्थानकात उतरल्यानंतर ती पायर्यावरुन उतरत होती. काही वेळासाठी ती पायर्यावर उभी राहून तिचा फोन पाहत होती. याच दरम्यान तिथे एक तरुण आला आणि त्याने तिच्याकडे अश्लील इशारे केले होते. त्याने तिला इशार्याकडे स्वतकडे बोलाविण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार ती प्रचंड घाबरली आणि तिथे न थांबता घरी निघून गेली. घरी गेल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांच्या सल्लानंतर तिने अंधेरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संंबंधित आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.