फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड हिरे दलालास अटक

सव्वाकोटीचे हिर्‍यांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ डिसेंबर २०२४
मुंबई, क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे सव्वाकोटीच्या हिर्‍यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्‍याची फसवणुक केल्याचा आरोप असलेल्या वॉण्टेड हिरे दलालास अखेर बीकेसी पोलिसांनी अटक केली. अनिल तुलसीभाई लुखी असे या आरोपीचे नाव असून या गुन्ह्यांचा त्याचा भाऊ अशोक तुलसीभाई लुखी हा सहआरोपी आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतलीे आहे. या दोन्ही बंधूंविरुद्ध अलीकडेच बीकेसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता, या गुन्ह्यांची माहिती मिळताच ते दोघेही पळून गेले होते. अटकेनंतर अनिल लुखीला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

संजय जयरामभाई बोदरा हे मलबार हिल परिसरात राहत असून आर जयकुमार ऍण्ड कंपनीत सेल्स एक्झक्युटिव्ह म्हणून कामाला आहे. त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्स, एफसी टॉवरसमोर आहे. २० ऑक्टोंबरला हिरे दलाल असलेले अशोक आणि अनिल लुखी हे दोघेही त्यांच्या कार्यालयात आले होते. या दोघांनी त्यांचा विश्‍वास संपादन करुन त्यांना त्यांच्या परिचित हिरे व्यापारी आहेत. या व्यापार्‍यांना चांगल्या हिर्‍यांची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या हिर्‍यांना चांगला भाव मिळवून देतो असे सांगितले. त्यानंतर हिरे व्यापार्‍यांना विक्रीसाठी त्यांच्याकडून त्यांनी ११ हजार १२१ कॅरेटचे १ कोटी २६ लाख ५३ हजार रुपयांचे हिरे घेतले होते. एका आठवड्यात हिरे किंवा हिर्‍यांच्या विक्रीतून आलेले पेमेंट करण्याचे आश्‍वासन दिले.

मात्र एक आठवडा उलटूनही ते दोघेही हिरे घेऊन आले नाही किंवा हिर्‍यांचे पेमेंट कंपनीत जमा केले नाही. त्यामुळे त्यांनी या दोन्ही हिरे दलालांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. नंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. विक्रीसाठी घेतलेले हिरे घेऊन ते दोघेही पळून गेले होते. हा प्रकार लक्षात येताच संजय बोदरा यांनी बीकेसी पोलिसांत दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अशोक लुखी आणि अनिल लुखी या दोन्ही दलालाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला दाखल करुन त्यांचा शोघ सरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना एक महिन्यानंतर पळून गेलेल्या अनिल लुखी याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच त्याच्या भावाच्या मदतीने १ कोटी २६ लाख रुपयांच्या हिर्‍यांचा अपहार करुन तक्रारदार व्यापार्‍याची फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या दोन्ही बंधूंनी तक्रारदारासह इतर काही हिरे व्यापार्‍यांची फसवणुक केली आहे, त्यांच्याविरुद्ध अशाच काही गुन्ह्यांची नोंद आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page