महापरिनिर्वाणदिनानिमित्त शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांचे साडेतीन हजार पोलीस सज्ज

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ डिसेंबर २०२४
मुंबई, – महामानव आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त शहरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांना विशेष सूचना जारी करण्यात आले आहे. तीन अतिरिक्त पोलीस आयुक्त, पाच पोलीस उपायुक्त, चौदा सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच ३७० हून अधिक अधिकार्‍यासह सुमारे साडेतीन हजार पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण दादर परिसरात तैनात करण्यात आला आहे. दादर येथील चैत्यभूमीवर लाखोंच्या संस्थेने भीमसागर जमा होणार असल्याचे या परिसरात स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिदीच्या पतनासह ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महानिर्वाणदिन सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसाकडून तीन अतिरिक्त पोलीस आयुक्त, पाच पोलीस उपायुक्त, चौदा सहाय्यक पोलीस आयुक्त, ३७० पोलीस अधिकारी, ३१०० पोलीस अंमलदार तसेच वाहतूक नियमनासाठी मुंबई पोलिसाकडून स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबत महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा कॉम्बॅक्ट, बीडीडीएस पक्ि अशा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात ाअले आहे. बंदोबस्तात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे सक्त इशाराच पोलीस आयुक्तांनी दिला आहे. दादर येथील चैत्यभूमीवर लाखोंच्या संस्थेने भीमसैनिक येणार असल्याने मुंबई पोलिसांसह महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली आहे.

वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून दादर परिसरातील काही वाहतुक एक दिशा मार्ग तर काही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही. तसेच वाहतूक पोलिसांनाही योग्य त्या सूचना जारी करण्यात आले आहे. यावेळी काही ठिकाणी पार्किंगला पूर्णपणे बंदी ठेवण्यात आली आहे. गर्दीचा फायदा घेऊन काही भुरटे चोरटे सोनसाखळी, पाकिटमारीचे गुन्हे करीत असल्याने साध्या वेशातील काही पोलिसांना तिथे तैनात करण्यात आले आहे. शिवाजी पार्क परिसरात सीसीटिव्ही कॅमेर्‍याच्या मदतीने संपूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

महिलांची छेडछाडीचे प्रकार होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे. कुठल्याही बेवारस वस्तूंना हात लावू नये, बेवारस वस्तू आढळल्या त्याची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, तसेच आवश्यक प्रसंगी नागरिकांनी पोलीस मदतीसाठी १०० व ११२ क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसाकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page