मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ डिसेंबर २०२४
मुंबई, – केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली ठगाने तात्काळ कर्ज घेऊन विशेष महिला शिक्षकेची फसवणूक केली. ठगाने ५ लाख रुपये कर्ज घेऊन ४ लाख ७८ हजार रुपये खात्यातून काढून घेतले. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
११ डिसेंबर २०२४
मुंबई, – केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली ठगाने तात्काळ कर्ज घेऊन विशेष महिला शिक्षकेची फसवणूक केली. ठगाने ५ लाख रुपये कर्ज घेऊन ४ लाख ७८ हजार रुपये खात्यातून काढून घेतले. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार या विशेष शिक्षिका म्हणून ताडदेव येथील एका शाळेत कार्यरत आहेत. गेल्या महिन्यात त्याना एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने त्याचे नाव सांगून तो बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवले. बँक खात्याचे केवायसी अपडेट करावे लागेल, अन्यथा खाते बंद होईल असे तिला सांगितले. जर केवायसी अपडेट करायचे असल्यास तीन नंबरवर तिला फोन करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन महिलेने त्यानंबर वर फोन केला. काही वेळाने महिलेच्या मोबाईलवर एक फोन आला. ठगाने महिलेला इ वॉलेट उघडण्यास सांगितले. त्यानंतर व्हाट्स अपवर स्क्रीन शेअर करण्यास सांगितले. महिलेने स्क्रीन शेअर केली. स्क्रीन शेअर केल्यावर ठगाने महिलेला जन्म तारीख आणि ओटीपी शेअर करण्यास सांगितला.
महिलेने तो ओटीपी शेअर केला. सायंकाळी सुट्टी झाल्यावर ठगाने तिला पुन्हा फोन केला. महिला लालबाग येथील एका एटीएम मध्ये गेली. एटीएम मधून तिने एका नंबरवर फोन केला. ठगाने प्रोसिजरच्या नावाखाली कार्ड मशीन मध्ये टाकण्यास सांगितले. तो मोबाईल नंबर स्क्रीन वर टाकण्यास सांगितले. महिलेने तो नंबर स्क्रीनवर टाकला. त्यानंतर तिच्या खात्यातून पैसे गेले. पैसे गेल्यावर तिने ठगाला विचारणा केली. ते पैसे पुन्हा खात्यात जमा होणार असल्याचे त्याने भासवले.
महिलेने याची माहिती तिच्या पतीला दिली. पतीने देखील त्या नंबरवर फोन करून विचारणा केली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी महिलेच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. तेव्हा ठगाने कोणतेही व्यवहार करू नका अशा भूलथापा मारल्या. रात्री पैसे खात्यात जमा न झाल्याने तिच्या पतीने एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महिलेच्या पतीने बँकेत जाऊन चौकशी केली, तेव्हा तिच्या खात्यावरचा नंबर बदलेला होता. त्या ऐवजी दुसरा नंबर होता. ठगाने नंबर ची अदलाबदल करून तात्काळ ५ लाख रुपयाचे कर्ज घेतले. त्यातील ४ लाख ७८ हजार रुपये ठगाने काढून देखील घेतले होते. याची माहिती त्याने ताडदेव पोलिसांना दिली. ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.