पुतणीच्या लग्नाचे दागिने व कॅश असलेली बॅग प्रवाशाच्या स्वाधीन केले

कुर्ला रेल्वे पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीची वरिष्ठांकडून दखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ मार्च २०२४
मुंबई, – – मध्यप्रदेशला जाताना एक्सप्रेस पकडताना गडबडीत प्लेटफार्म विसलेल्या पुतणीच्या लग्नाचे दागिन्यासह कॅश असलेली बॅग प्रवाशांच्या स्वाधीन करण्यात कुर्ला रेल्वे पोलिसांना यश आले. या बॅगेत सुमारे सहा लाखांचे सोन्याचे दागिने, ऐंशी हजार रुपयांची कॅश, दोन लॅपटॉप आणि लग्नाचे कपडे होते. सर्व मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदारांनी कुर्ला रेल्वे पोलिसांचे आभार व्यक्त केले होते. दुसरीकडे या कामगिरीची रेल्वेच्या वरिष्ठांनी दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव व त्यांच्या पथकाचे कौतुक केले होते.

रवी नंदलाल जैन हे कांदिवलीतील इराणीवाडी रोड, कापाडिया हाईट्स अपार्टमेंटमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. गुरुवारी ७ मार्चला दुपारी अडीच वाजता ते कामयानी एक्सप्रेसने मध्यप्रदेशला जाण्यासाठी कुर्ला टर्मिनस रेल्वे स्थानकात आले होते. यावेळी एक्सप्रेसमध्ये चढताना गडबडीत त्यांच्या तीन बॅग प्लेटफॉर्मवर राहित्या होत्या. हा प्रकार नंतर लक्षात येताच त्यांनी रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांक १५१२ वर संपर्क साधून तिथे असलेल्या पोलिसांना ही माहिती सांगून मदतीची विनंती केली होती. त्यानंतर ही माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांना देण्यात आले होते. पोलीस हवालदार पवार यांच्याकडून ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माने, पोलीस हवालदार लालगे, पवार, कांबळे, सोनावणे, पोलीस नाईक येवले, पोलीस शिपाई शेख यांनी तिथे जाऊन सर्व सामानाची पाहणी केली होती.

यावेळी पोलिसांना तिथे एक ट्रॉली बॅग, एक सॅक बॅग आणि एक थेला असे तिन्ही बॅग सापडल्या. या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात रवी जैन यांच्या पुतणीच्या लग्नाचे सहा लाख रुपयांचे ९८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ऐंशी हजार रुपयांची कॅश, दोन लॅपटॉप तसेच लग्नाचे कपडे होते. या तिन्ही बॅगेची शहानिशा केल्यांनतर रवी जैन यांच्याकडे सर्व मुद्देमाल स्वाधीन करण्यात आला होता. एक्सप्रेस चढताना बॅग विसल्यानंतर कुर्ला रेल्वे पोलिसंनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही बॅग ताब्यात घेतले. त्यामुळे आतील सर्व मुद्देमाल परत मिळविण्यात तक्रारदारांना यश आले. यावेळी रवी जैन यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव व त्यांच्या पथकाने आभार व्यक्त केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page