मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ डिसेंबर २०२४
मुंबई, – विदेशातून आणलेल्या सोने तस्करीच्या गुन्ह्यांत दोन प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी २ किलो ७३ ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले असून त्याची किंमत सुमारे दिड कोटी रुपये आहे. दोन्ही प्रवाशांविरुद्ध गुन्हा नोंदवून नंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही वर्षांत विदेशातून सोने तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. अशा सोने तस्कराविरुद्ध कस्टम अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बुधवारी एका प्रवाशाला सीआयएसएफच्या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात तीन अंडाकृती कॅप्सुल सापडले होते. या कॅप्सुलची तपासणीनंतर त्यात सोने लपवून आणल्याचे उघडकीस आले होते. त्यात या अधिकार्यांना १ किलो ३६३ ग्रॅम वजनाचे सोने सापडले. त्याची किंमत ९६ लाख रुपये इतकी होती. हा प्रकार उघडकीस येताच या प्रवाशाला पुढील चौकशीसाठी सीमा शुल्क विभागाकडे सोपविण्यात आले. चौकशीत त्याला ते सोने एका ट्रान्झिंट प्रवाशाने दिले होते. ते सोने घेऊन त्याला विमानतळाबाहेर बोलविण्यात आले होते. मात्र विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली.
दुसर्या कारवाईत अन्य एका प्रवाशाला या अधिकार्यांनी अटक केली. तो जैद्दाहून मुंबईत आला होता. त्याने शरीरात सोने लपवून आणले होते. ही माहिती प्राप्त होताच त्याला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याने शरीरातील पोकळीत लपवून आणलेले ७१० सोन्याची पावडर जप्त केली. त्याची किंमत सुमारे ५२ लाख रुपये आहे. या दोन्ही प्रवाशांविरुद्ध सोने तस्करीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.