मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी, मात्र कुर्ल्यातील अधिकृत झोपडीधारक असल्याचा दावा
बोगस कागदपत्रांच्या आधारे दहा कोटीच्या ५३ सदनिका बळकाविण्याचा धक्कादायक प्रकार उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ मार्च २०२४
मुंबई, – मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असताना बोगस कागदपत्रांच्या आधारे कुर्ला येथील क्रांतीनगर, संदेशनगरातील स्थानिक झोपडीधारक असल्याचा दावा करुन राज्य शासनाच्या विमानपतन पुर्नवसन योजनेतर्ंगत सुमारे दहा कोटीच्या ५३ सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी ५९ जणांविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन राज्य शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच बारा बोगस झोपडीधारकांना साकिनाका पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप सुदर्शन यादव, राजेश रामसमुज यादव, सुनिलकुमार पुरण यादव, संदीप नकडू यादव, अवधेश राममणी यादव, सुदर्शन सुधू यादव, नखडू सुधू यादव, गुल्लू रघुनाथ यादव, सुभाष बाळू यादव, कुणाल संजय घोलप, आकाश विनायक भोसले, मोहम्मद तौफिक नवाअली सय्यद अशी या बाराजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत ४७ हून अधिक लोकांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सागर मुरलीधर तोरणे हे ठाण्याच्या पाचपाखडी परिसरात राहत असून सध्या वांद्रे येथील एमएमआरडीएमध्ये संगणक चालक-लिपीक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे विमानपतन झोपडपट्टी पुर्नविकासाचे काम असून विमानपतन प्राधिकरण जागेवरील झोपड्याचे पुनवर्सन करण्याचे काम आहे. कुर्ला येथील बैलबाजार, संदेशनगर आणि क्रांतीनगर परिसरातील काही झोपड्याचे पुर्नविकासाचे काम एमएमआरडीएने हाती घेतले होते. या ठिकाणी एकूण २११६ झोपडीधारक असून त्यापैकी १०३१ झोपडीधारक पात्र तर उर्वरित १०७६ झोपडीधारक अपात्र आहे. नऊ झोपडीधारक अनिर्णित आहेत. क्रांतीनगरात १६३९ पैकी ८४ झोपडीधारक पात्र असून आठजणांचे अर्ज रद्द करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणाच्या झोपडीधारकापैकी कांतीनगर येथील ५६७ तर संदेशनगरात येथील ९६१ झोपडीधारकाची सोडत काढण्यात आली होती. २६ फेब्रुवारी २०२४ पासून या झोपडीधारकांना कुर्ला येथील प्रिमिअर कंपाऊंडमध्ये बांधण्यात आलेल्या पुर्नवसन सदनिकेमध्ये विवरणपत्र, ताबा पावती आणि चावी वाटपाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
हा कार्यक्रम सुरु असताना हॉलच्या पार्किगमधील वाहनांमध्ये या अधिकार्यांना वाटप करणयात आलेल्या सदनिकेपैकी ५४ सदनिकांचे स्टॅम्प पेपर असलेले बोगस कागदपत्रे सापडले होते. त्यात पॅनकार्ड, आधारकार्ड, झोपड्याचे कागदपत्रे वाटप करणयात आलेल्या सदनिकेची चावी, इमारत क्रमांक दोन/सी विंग/ ७०८ आणि ६०४ चे अग्रीमेंट ऑफ सेल, ऍथोरिटी लेटर, ऍफिडेव्हीड, रद्द न करता येणारे कुळअख्त्यार पत्र, प्रॉमिसरी लेटर, नोटरी रजिस्टर आदी घाटकोपरच्या कन्नमवार येथील झोपड्याचे कागदपत्रांचा समावेश होता. या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पाचजणांच्या टोळीने ५४ सदनिका काही रक्कमेस खरेदी-विक्री करुन या संपूर्ण व्यवहाराचे बोगस कागदपत्रे तयार केले होते. हा प्रकार उघडकीस येताच एमएमआरडीएच्या वतीने साकिनाका पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींची बोगस कागदपत्रे सादर करुन त्यांच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार करण्यात आली होती.
यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या बारा संशयितांची पोलिसांनी चौकशी करण्यात आली होती. त्यांचयाकडे या कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्यांची उडवाउडवीचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. चौकशीदरम्यान काही रहिवाशी उत्तरप्रदेशचे रहिवाशी असताना त्यांच्या नावाने क्रांतीनगर येथील रहिवाशी असल्याचे कागदपत्रे बनविण्यात आले होते. संबंधित आरोपी मूळ झोपडीधारक नसून त्यांनी बोगस कागदपत्रे बनवून ते पात्र झोपडीधारक असल्याचे भासविले होते. अशा प्रकारे त्यांनी राज्य शासनाच्या सदनिकेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे संबंधित सर्व आरोपीविरुद्ध बोगस कागदपत्रे बनवून त्याचा वापर करुन पुर्नवर्सन योजनेतील घरांची विक्री दहा वर्षांसाठी करता येत नसतानाही संबंधित झोपडीधारक व खरेदी करणारे आरोपी यांनी शासकीय योजनेचा गैरफायदा घेऊन शासनाची फसवणुक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच प्रदीप यादव, राजेश यादव, सुनिल यादव, संदीप यादव, अवधेश यादव, सुदर्शन यादव, नखडू यादव, गुल्लू यादव, सुभाष यादव, कुणाल घोलप, आकाश भोसले, मोहम्मद तौफिक सय्यद या बाराजणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने या सर्वांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यांत ४७ हून जणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या आरोपींमध्ये सुरेश मिथूराम यादव, रमेश वासुदेव यादव, प्रेमशंकर लुथरु यादव, राजेश रामसमुज यादव, हसांराम सिमाचल कुमार, रविंद्र बनवारी यादव, अशोक रामनाथ यादव, छोटेलाल जगन्नाथ गुप्ता, विमल गंगाधर यादव, रामकिरीट रामरुपी यादव, रजनीकांत अपनाकांत राऊळ, परशुराम भगवान दत्त यादव, बाबूनारायण संतू यादव, बिमलेश शोरी यादव, प्रदीप सुदर्शन यादव, पूनम वरवाणी यादव, चिंटू गुरचरण यादव, अर्चना लवटन यादव, रामाश्रय रघुनाथ यादव, सुनिल महिंद्राप्रसाद यादव, शोरी लुरखूर यादव, मुबीना मोहनलाल जैन, लालबहादूर विश्वनाथ यादव, संजय ईश्वरदेव यादव, सविता रामअवध यादव, कमलेश छंटकी यादव, कैलासनाथ बांगूर यादव, सत्यनारायण माखन यादव, लहानभाई लक्ष्मण वाकचोरे, रामसुरत जगमोहन राम, इरफान अब्दुल माजिद शेख, राजेश शिवबदन यादव, भिमकुमार देवू यादव, जयश्री संभाजी पवार, मोहन नारायण झरे, राजेंद्रप्रसाद संजीव पाल, महेश उमाशंकर यादव, प्रतिक शंकर चौहाण, रामदरस रघुनाथ यादव, जरीना अख्तर हुसैन शेख, सुनिता हरिश्चंद्र चौहाण, दुर्गेश भोला यादव, शिवजनक सुखनंदन यादव, साबीरखातून जायेश खान आणि अशोककुमार इंद्रलाल जैन यांच्यासह इतरांचा समावेश आहे.