बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणार्या घटनेने संताप
पंधरा वर्षांच्या बहिणीवर भावाकडूनच लैगिंक अत्याचार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ डिसेंबर २०२४
मुंबई, – बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना वडाळा परिसरात उघडकीस आली आहे. पंधरा वर्षांच्या अल्पवयीन बहिणीवर तिच्याच भावाने लैगिंक अत्याचार केला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच १८ वर्षांच्या आरोपी भावाला रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथेच तिची मेडीकल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
पिडीत मुलगी ही पंधरा वर्षांची असून ती वडाळा परिसरात राहते. आरोपी हा तिचा मोठा भाऊ आहे. १ नोव्हेंबर २०२४ रोजी घरात कोणीही नसताना त्याने त्याच्याच बहिणीवर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकीही त्याने तिला दिला होता. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्यामुळे त्याने तिच्यावर १ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत पुन्हा लैगिंक अत्याचार केला होता. डिसेंबर महिन्यांत तिची मासिक पाळी बंद झाली होती. त्यामुळे तिला मेडीकलसाठी केईएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मेडीकलनंतर ती दिड महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच ही माहिती नंतर रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांना देण्यात आली होती.
घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी पिडीत मुलीची चौकशी केली असता तिच्यावर तिच्याच भावाने लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी भावाविरुद्ध ६४ (२), (एफ) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ५ (एन), ६ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी भावाला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची लवकरच पोलिसांकडून मेडीकल केली जाणार आहे. बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणार्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.