शेअर ट्रेडिंगच्या नावाने गंडा घालणार्या ठगाला अटक
वयोवृद्ध जोडप्याची ३६ लाखांची फसवणुक केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ डिसेंबर २०२४
मुंबई, – शेअर ट्रेडिंगच्या नावाने गंडा घालणार्या एका ठगाला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. हैदर अब्दुल कादर सय्यद ऊर्फ साहिल असे या ठगाचे नाव असून त्याने ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपींना विविध बँकेत खाती उघडून दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्या इतर काही साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
७४ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार राजकुमार मुरारीलाल सेठ हे त्यांच्या पत्नीसोबत मालाड परिसरात राहतात. एल ऍण्ड टी इनफोटेक कंपनीतून ते निवृत्त झाले आहेत. त्यांनी शेअरमध्ये काही गुंतवणुक केली असून त्यांचे डिमॅट खाते आहे. सप्टेंबर महिन्यांत ते एका खाजगी कंपनीच्या साईटची पाहणी करत होते. कंपनीची लिंक ओपन करुन त्यांनी त्यांचा मोबाईल आणि पासवर्ड टाकून लॉगिंन केले होते. त्यानंतर त्यांना कंपनीने त्यांच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड केले होते. त्यात शेअरसंदर्भातील दैनदिन माहिती दिली जात होती. या ऍपमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे स्टॉक, ओपीओ, त्यांचे दर आदी माहिती दिसत होती. त्यामुळे त्यांना कंपनीच्या ऍपवर विश्वास बसला होता. या गु्रपमध्ये अनेक सभासद होते, त्यापैकी बहुतांश सभासदांनी कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले.
याच दरम्यान त्यांना ग्रुप ऍडमिनने शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. कंपनीवर विश्वास ठेवून त्यांच्यासह त्यांच्या पत्नीने विविध शेअरमध्ये ३० लाख ४३ हजाराची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर काही दिवसांत त्यांना चांगला फायदा झाल्याचे दिसून आले होते त्यामुळे त्यांनी काही रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. त्यामुळे त्यांचा ऍपवर अधिक विश्वास बसला होता. त्यामुळे त्यांनी पत्नीसह कंपनीच्या माध्यमातून आणखीन काही शेअरमध्ये गुंतवणुक केली होती. गेल्या तीन महिन्यांत त्यांनी ३६ लाख ५० हजाराची गुंतवणुक केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा स्वतच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना संबंधित रक्कमेवर टॅक्स, डिपॉझिट रक्कम म्हणून तीस लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी विजय बजाज यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी त्यांना तीसऐवजी वीस लाख रुपये भरण्यास सांगितले. स्वतचे पैसे काढण्यासाठी त्यांनी पैसे भरण्यास सांगितले होते, त्यामुळे त्यांना संशय आला होता. त्यांनी कंपनीशी संपर्क साधला असता या कंपनीशी त्यांच्या कंपनीशी काहीही संबंध नसल्याचे उघडकीस आले.
शेअर ट्रेडिंगच्या नावाने बोगस कंपनी सुरु करुन अज्ञात सायबर ठगांनी त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमातर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन हैदर अब्दुल ऊर्फ साहिल या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी त्याच्या बँक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. सायबर ठगांसाठी त्याने बँकेत खाते उघडले होते. ही रक्कम सायबर ठगांना दिल्यानंतर त्याला काही रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती. चौकशीत ही माहिती उघडकीस येताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आली आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.