पंजाबच्या खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंधित आरोपीस अटक

दहशवाद्यासह गॅगस्टरला घातक शस्त्रे पुरविल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ डिसेंबर २०२४
मुंबई, -पंजाबच्या खालिस्तानी दहशतवादी लखवीर सिंग ऊर्फ लांडा याचा अत्यंत विश्‍वासू वॉण्टेड सहकारी जतिंदरसिंग ऊर्फ ज्योती याला मानखुर्द येथून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शिताफीने अटक केली. जतिंदरसिंगवर दहशतवाद्यासह गॅगस्ट बचितर सिंग ऊर्फ पवित्र याच्या सहकार्‍यांना मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रे पुरविल्याचा आरोप असून तो बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तो एनआयएच्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जतिंदरसिंग हा पंजाबच्या गुरुदासपूरचा रहिवाशी असून काही वर्षांपूर्वी तो खालिस्तानी दहशतवादी लखवीरसिंग ऊर्फ लांडा आणि गॅगस्टर बचितर सिंग यांच्या संपर्कात आला होता. तेव्हापासून तो त्यांच्यासाठी काम करत होता. त्यांच्या सहकार्‍यांना त्याने मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रे पुरविले होते. याच दरम्यान लखवीर सिंग याने बब्बर खालसा इंटरनॅशनल नावाची एक दशहतवादी संघटना स्थापन केली होती. या संघटनेचा तो सभासद झाला होता. याच संघटनेसाठी त्याचे गुप्तपणे कारवाया सुरु होत्या. जुलै २०२४ रोजी त्याने मध्यप्रदेशातून बलजीत सिंग ऊर्फ राणूभानू याच्याकडून दहा पिस्तूलसह जिवंत काडतुसांचा साठा घेतला होता. ते शस्त्रे त्यांनी त्याच्या संघटनेसह बचितर सिंग याच्या सहकार्‍यांना पुरविले होते. बलजीत सिंग याच्या अटकेनंतर पहिल्यांदा जतिंदरसिंग याचे नाव समोर आले होते.

अटकेच्या भीतीने तो पंजाबमधून पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एनआयएने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना तो मानखुर्द परिसरात लपला असल्याची माहिती या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे काही दिवस साध्या वेशात पाळत ठेवली होती. अखेर सोमवारी जतिंदरसिंग याला ताब्यात घेण्यात या पथकाला यश आले. मानखुर्द येथे राहून तो आणखीन शस्त्रांची जमवाजमव सुरु होती. मात्र त्यापूर्वीच त्याला एनआयएच्या अधिकार्‍यांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page