बदनामीची धमकी देऊन चौदा वर्षांच्या मुलीवर अत्याचार
लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या गुन्ह्यांत तरुणाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ डिसेंबर २०२४
मुंबई, – बदनामीची धमकी देऊन चौदा वर्षांच्या मुलीवर तिच्याच मित्राने लैगिंक अत्याचार केल्याची घटना नागपाडा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या गुन्ह्यांत युनूस नावाच्या एका २० वर्षांच्या आरोपी तरुणाला नागपाडा पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
४२ वर्षांची तक्रारदार महिला ही नागपाडा परिसरात राहते. पिडीत चौदा वर्षांची तिची मुलगी आहे. जानेवारी २०२२ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत आरोपीने पिडीत मुलीशी जवळीक साधून लगट करण्याचा प्रयत्न केला होता. तिची घरासह मोहल्ल्यात बदनामीची धमकी दिली होती. तिला ब्लॅकमेल करुन त्याने तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. हा प्रकार तिच्या आईला समजताच तिने नागपाडा पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिने युनूसविरुद्ध तक्रार करुन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्घ लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला नागपाडा येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.