मांजर लपविली म्हणून मुलीला मारहाण करुन गरम चटके दिले

३८ वर्षांच्या सावत्र आईविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जानेवारी २०२४
मुंबई, – मांजर लपविली म्हणून आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला तिच्याच सावत्र आईने पक्कडने बेदम मारहाण करुन गरज पक्कडने तिच्या पायाला चटके दिल्याची धक्कादायक घटना गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेजारी राहणार्‍या एका कॅबचालक तरुणाच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी ३८ वर्षांच्या निशाद या सावत्र आईविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत तिला ताब्यात घेतल्यानंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.

सोहेल मोहम्मद तालीब शेख हा २६ वर्षांचा तरुण कॅबचालक म्हणून काम करतो. सध्या तो गोवंडीतील शिवाजीनगर, रोड क्रमांक एकमध्ये राहतो. याच परिसरात निशाद ही महिला तिच्या पती आणि आठ वर्षांची सावत्र मुलगी शबाना (नावात बदल) हिच्यासोबत राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. गुरुवारी २ जानेवारीला सकाही अकरा वाजता शबाना ही त्यांच्या घरी आली होती. तिच्या डोक्यातून रक्त येत होते. त्यामुळे त्यांनी तिची आपुलकीने चौकशी केली होती. यवेळी तिने तिच्या घरातील पाळलेले मांजर लपवून ठेवले म्हणून तिची सावत्र आई निशाद हिने तिला लोखंडी पक्कडने बेदम मारहाण केली. त्यात तिच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यातून रक्त येत आहे. त्यानंतर तिने तीच पक्कड गरम करुन तिच्या उजव्या पायाला चटके दिले होते. त्यामुळे ती घाबरुन त्यांच्या घरी आल्याचे सांगितले.

आठ वर्षांच्या सावत्र मुलीने इतक्या क्रुरपणे मारहाण आणि गरम चटके दिल्याने त्यांना प्रचंड राग होता. त्यामुळे ते तिला घेऊन जवळच्या डॉक्टरकडे घेऊन गेले होते. तिथेच शबानावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीची पोलिसांनीही गंभीर दखल घेत आरोपी महिला निशादविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिची चौकशी करुन तिला नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

पाळलेली मांजर लपविली म्हणून सावत्र आईने आठ वर्षांच्या मुलीला केलेली मारहाण आणि पक्कडने गरम चटके दिल्याचे वृत्त समजताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम. पाटील, पोलीवस उपनिरीक्षक दुधाळ हे तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page