मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ जानेवारी २०२४
मुंबई, – हिंदू धर्मात महाकुंभ पवित्र मानले जाते. यंदा महाकुंभ उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये संपन्न होणार आहे. महाकुंभसाठी उत्तर प्रदेश सरकारने पूर्ण जय्य्त तयार केली होती. देशभरातून श्रद्धाळू भाविक, अतिमहत्वाचे मान्यवर, राजकीय नेते या कुंभाला हजेरी लावणार आहेत. महाकुंभच्या नावाखाली ठगाने वृद्ध व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना अंधेरी परिसरात समोर आली आहे. विमान तिकीट आणि महाकुंभच्या नावाखाली ठगाने व्यावसायिकाला चुना लावला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
सायबर ठग हे फसवणुकीसाठी दिवसेंदिवस नवनवीन आयडिया शोधून काढतात. सण असो वा व्यावसायिक याच्या वाढदिवस किंवा कंपनीला मोठा नफा झाल्याचे भासवून बँक खात्यावर डल्ला मारतात. यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात प्रयागराज येथे महाकुंभ मेळा संपन्न होणार आहे. त्याचा फायदा ठगाने घेतला. महाकुंभच्या नावाखाली ठगाने फसवणूक केल्याची पहिली घटना मुंबईत घडली. अंधेरी येथे तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असून ते व्यावसायिक आहेत.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा पार पडणार आहे. त्या महाकुंभसाठी तक्रारदार याना तेथे जायचे होते. त्यासाठी त्याने गुगलवर बुकिंग साठी सर्च केले. तेव्हा त्यांना एक साईड दिसली. त्या साईडवर एक नंबर होता. त्या नंबरवर तक्रारदार याने फोन केला. त्याने बुकिंग बाबत डिटेल्स दिली.
तक्रारदार याने त्याच्या पत्नीच्या मोबाईलवर एका नंबरवर मेसेज केला. मेसेज केल्यावर महाकुंभ मेळा बाबत माहिती पाठवली. ३ जणांचे बुकिंग साठी १४ हजार रुपये द्यावे लागतील असे त्याना सांगितले. ठगाने त्याना पैसे ऑनलाईन पाठवण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन त्याने १४ हजार रुपये आरटीजीएस द्वारे पाठवले. पैसे पाठवल्यानंतर ठगाने त्याना विमान सेवेचे बुकिंग बाबत विचारणा केली. मुंबई ते प्रयागराज परतीच्या प्रवासा बाबत विचारणा केली. विमान प्रवासाचे ८७ हजार रुपये लागतील असे त्याना सांगितले. तक्रारदार याच्या मुलाने ऑनलाईन पैसे पाठवले. पैसे पाठवल्यानंतर त्याने विमान तिकीट पाठवण्यास सांगितले. तिकीट पाठवण्यास तो टाळाटाळ करू लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला.
Next Post