ट्रॅव्हेल्स बसच्या धडकेने बाईकस्वाराचा मृत्यू

अपघातानंतर बसचालकाचे घटनास्थळाहून पलायन

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ जानेवारी २०२५
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या एका ट्रॅव्हेल्स बसच्या धडकेने धनजी पूंजा हथियानी या ४१ वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर बसचालक घटनास्थळाहून पळून गेला आहे. त्याच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

हा अपघात मंगळवार ७ जानेवारीला दुपारी सव्वाबारा वाजता बोरिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, एम. के बेकरीजवळ झाला. ४२ वर्षांचे गणेश पंजा हथियानी हे घाटकोपर येथील सुभाषनगर, हवाबाई चाळीत राहतो. माटुंग्यातील एका स्टेशनरी दुकानात गणेश हा कामाला आहे. मृत धनजी हा त्याचा लहान भाऊ असून त्याच्यासह दुसरा भाऊ मनजी असे दोघेही कांदिवलीतील सिंग इस्टेट, रोड क्रमांक दोन, गणेश सोसायटीमध्ये राहतात. मंगळवारी दुपारी धनजी हा त्याच्या ऍक्टिव्हा बाईकवरुन मिरारोडला जाण्यासाठी घरातून निघाला होती. ही ऍक्टिव्हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळील एम. के बेकरीजवळ येताच भरेगात जणार्‍या एका ट्रॅव्हेल्स बसने त्याच्या ऍक्टिव्हाला जोरात धडक दिली होती. या अपघातात तो गंभीरीत्या जखमी झाला होता.

अपघाताची माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या धनजीला पोलिसांनी कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्य ेदाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी गणेश हथियानी यांच्या तक्रारीनंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अज्ञात ट्रॅव्हेल्स बसचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून एका ऍक्टिव्हा बाईकस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर बसचालक जखमीला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्यामुळे परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या बसचालकाचा पोलीस शोध घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page