सहाय्यक फौजदार प्रफुल्ल सुर्वे यांचे हृदयविकराचे निधन
साईभक्त असलेले सुर्वे हे शर्डीला पायी चालत गेले होते
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० जानेवारी २०२५
मुंबई, – अंधेरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार प्रफुल्ल सुर्वे यांचे हृदविकराने निधन झाले. प्रफुल्ल सुर्वे हे भाईभक्त होते, ते त्यांच्या सहकार्यांसोबत पायी शिर्डीला चालत गेले होते, तिथेच त्यांना हृदयविकराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली आहे.
अंधेरीतील डी. एन नगर पोलीस वसाहतीच्या इमारत क्रमांक ३३ मध्ये प्रफुल्ल सुर्वे हे त्यांच्या पत्नी आणि मुलगा अनुराग यांच्यासोबत राहत होते. पोलीस सोसायटीचे संचालक आणि लोकांच्या मदतीला सदैव तत्पर असलेले प्रफुल्ल सुर्वे हे अंधेरी पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी ते वर्सोवा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. अलीकडेच त्यांची त्यांची वर्सोवा येथून अंधेरी पोलीस ठाण्यात बदली झाली होती. ते भाईभक्त होते, दरवर्षी ते शिर्डीला पायी चालत जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिर्डीला जाण्यासाठी सुट्टी घेतली होती आणि ते शिर्डीला गेले होते. शुक्रवारी दुपारी ते त्यांच्या सहकार्यासोबत दर्शन घेणार होते.
मात्र सकाळी साडेपाच वाजता त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना तेथील स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या सहकार्यांना धक्काच बसला होता. शिर्डीहून त्यांचे पार्थिव अंधेरीतील राहत्या घरी आणण्यात येणार असून रात्री उशिरा त्यांच्यावर आंबोलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. पायी चालत गेलेले प्रफुल्ल सुर्वे हे त्यांच्या सहकार्यांसोबत शुक्रवारी दुपारी साईबाबांचे दर्शन घेणार होते, मात्र दर्शन घेण्यापूर्वीच त्यांना ऍटक आला आणि त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या सहकार्यामध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.