मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ जानेवारी २०२५
मुंबई, – कांदिवलीतील एका २७ वर्षांच्या तरुणीशी मैत्री करुन जवळीक साधून तिच्याच मित्राने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. तिच्यासह तिच्या आई-वडिलांच्या नावाने विविध बँकेत बचत आणि चालू खाते उघडून विविध बँकेतून पर्सनल व कंज्युमर लोन घेऊन सुमारे सव्वाकोटीची फसवणुक केली. इतकेच नव्हे तर तिच्या होणार्या पतीला त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे अश्लील फोटो पाठवून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आशिष राधेशाम चिचाणी या ४२ वर्षांच्या आरोपीविरुद्ध कांदिवली पोलिसांनी फसवणुकीसह लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
२७ वर्षांची पिडीत तरुणी ही तिच्य पालकांसोंबत कांदिवली परिसरात राहते. सहा वर्षापूर्ंवी तिची आशिषसोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. तिचा विश्वास संपादन करुन त्याने तिच्यासह तिच्या आई-वडिलांच्या नावाने विविध बँकेत बचत आणि चालू उघडले होते. त्यांच्या वतीने त्याने काही बँकांमध्ये पर्सनल आणि कंज्युअर लोन काढले होते. या बँकांकडून त्यांना एक कोटी वीस लाख रुपयांचे कर्ज मिळाले होते. ही रक्कम बँक खात्यात जमा होताच त्याने या पैशांचा परस्पर अपहार करुन तिची फसवणुक केली होती. याच दरम्यान त्याने पिडीत तरुणीशी जवळीक साधून तिला तो अविवाहीत असल्याचे सांगितले.
तिला लग्नाची मागणी घालून त्याने तिच्याशी तिच्या राहत्या घरासह बहिणीच्या मिरारोड येथील राहत्या घरी शारीरिक संबंध ठेवले होते. या शारीरिक संबंधाचे त्याने काही अश्लील फोटो काढले होते. यावेळी तिने त्याला अनेकदा लग्नाविषयी विचारणा केली होती, मात्र त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. तसेच लग्नाचा विषय काढल्यानंतर तो तिला शिवीगाळ करुन धमकी देत होता. याच दरम्यान तिचे एका तरुणासोबत लग्न ठरले होते. ही माहिती मिळताच त्याने त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे अश्लील फोटो तिच्या होणार्या पतीला पाठवून तिची बदनामी केली होती. हा प्रकार त्याच्याकडून समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
मार्च २०१९ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत आशिषने पिडीत तरुणीशी मैत्री करुन तिच्यासह तिच्या आई-वडिलांच्या नावाने विविध बँकेत खाते उघडून त्यांच्या नावाने कर्ज घेतले. एक कोटी वीस लाखाच्या कर्जाच्या पैशांचा अपहार करुन तिची फसवणुक केली. त्यानंतर तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन तिचे अश्लील फोटो तिच्या होणार्या पतीला पाठवून तिची बदनामी केली होती. या घटनेनंतर तिने घडलेला प्रकार कांदिवली पोलिसांना सांगून आरोपी मित्र आशिषविरुद्ध तक्रार केली होती. या तक्राराची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३७६, ३७६ (२), (एन), ४२०, ५००, ५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आशिष हा मिरारोडख्या गोल्डन नेस्टजवळील रामेश्वर दोन अपार्टमेंटमध्ये राहत असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.