मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ मार्च २०२४
मुंबई, – वाढदिवसाच्या दिवशीच एका चौदा वर्षांच्या अल्पवयीनम मुलीने तिच्या राहत्या गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. या मुलीच्या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती. तिच्याकडे कुठलीही सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे तिने आत्महत्या का केली याचा खुलासा होऊ शकला नाही. तिच्या आई-वडिलांसह बहिणीच्या जबानीतून तिच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध सुरु आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
दहिसर येथे मृत चौदा वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. तिचे वडिल मजुरीचे काम करतात. रविवारी तिचा वाढदिवस होता. सकाळी तिचे आई-वडिल नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले. दुपारी तिची मोठी बहिण काही कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी घरात तिच्याशिवाय अन्य कोणीही नव्हते. सायंकाळी तिच्या बहिणीने तिला फोन केला होता. मात्र तिने तिला प्रतिसाद दिला नाही. वारंवार फोन करुनही ती फोन घेत नव्हती. त्यामुळे तिला संशय आला. तिने शेजारी राहणार्यांना ही माहिती सांगून घरी जाण्याची विनंती केली होती. यावेळी एकाला या मुलीने घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती त्याने तिच्या पालकांसह बहिण आणि स्थानिक एमएचबी पोलिसांना दिली. ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती नंतर तिच्या पालकांना देण्यात आली होती. मुलीच्या आत्महत्येने तिच्या पालकांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
घटनास्थळी पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे तिने आत्महत्या का केली याचा आता पोलीस तपास करत आहेत. लवकरच तिच्या आई-वडिल, बहिणीसह स्थानिक रहिवाशी तसेच तिच्या मित्र-मैत्रिणींची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून तिच्या आत्महत्येमागील कारण शोधून काढण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. तिच्या पालकांच्या जबानीवरुन पोलिसांनी एडीआरची नोंद आहे. वाढदिवसाच्या दिवशीच या मुलीने आत्महत्या केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.