लैगिंक अत्याचारासह फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

पळालेल्या कथित मौलानाचा पोलिसांकडून शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जानेवारी २०२५
मुंबई, – मुलांना शिकवणीच्या बहाण्याने एका महिलेवर लैगिंक अत्याचार करुन तिच्याकडून घेतलेल्या सुमारे पावणेनऊ लाखांचा अपहार करुन तिची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमजद शेख या कथित मौलानाविरुद्ध मालवणी पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या या आरोपीचा मालवणी पोलिसाकडून शोध घेत आहेत.

३१ वर्षांची पिडीत महिला मालाडच्या मालवणी परिसरात राहते. दोन वर्षाची तिची अमजद शेख याच्याशी ओळख झाली होती. याच परिसरातील मशिदीमध्ये त्याने तो मौलाना म्हणून काम करत असल्याचे सांगितले होते. तिच्या मुलांना धार्मिक शिक्षण देण्याचा बहाणा करुन तो तिच्या घरात अधूनमधून येत होता. त्यातून त्यांची चांगली ओळख झाली होती. याच दरम्यान त्याने तिच्याशी जवळीक साधून सप्टेंबर २०२२ रोजी गुंगीचे औषध दिले होते. बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार नंतर या महिलेच्या लक्षात येताच त्याने तिची माफी मागून तिच्याशी लग्न करण्याचे आश्‍वासन दिले होते.

लग्नाच्या आमिषाने त्याने तिच्यावर गेल्या दोन वर्षांत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले होते. तसेच विविध कारण सांगून तिच्यासह तिच्या भावाकडून पैशांची मागणी केली होती. या दोघांनी त्याला आतापर्यंत आठ लाख सत्तर पाचशे रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम त्याच्या बँकेत खात्यात पाठविण्यात आली आहे. मुलांना शिकवणीसाठी घरात प्रवेश करुन त्याने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सलग जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. इतकेच नव्हे तर उधारीने घेतलेल्या पैशांचा अपहार करुन त्याने तिची फसवणुक केली होती.

हा प्रकार या महिलेच्या लक्षात येताच तिने अमजद खानविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच अमजद हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page