मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जानेवारी २०२५
मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) – मालाडच्या मालवणी परिसरात दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुलीसह एका बारा वर्षांच्या मुलाशी अश्लील चाळे करुन त्यांचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी चार स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत एका आरोपीला पोलिसांनी अटक केली तर इतर तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दोन दिवसांत घडलेल्या चार वेगवेगळ्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
२६ वर्षांची तक्रारदार महिला ही मालाडच्या मालवणी परिसरात राहते. तिला सात वर्षांची मुलगी आहे. बुधवारी सायंकाळी पावणेसहा वाजता ती दुकानात गेली होती. दुकानातून घरी जाताना इमारतीच्या लिफ्टजवळ थांबली होती. यावेळी तिथे एक तरुण आला आणि त्याने तिला जिन्यावरुन जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ती जिन्यावरुन जात होती. पहिल्या आणि दुसर्या मजल्याच्या मध्यभागी आल्यानंतर या तरुणाने तिला जबदस्तीने स्वतकडे ओढणी तिच्याशी अश्लील चाळे केले. तिच्या अंगावरील कुर्ती वर करुन तिचा विनयभंग केला होता. तिने आरडाओरड करण्यापूर्वीच तो जिन्यावरुन खाली उतरुन पळून गेला. घरी गेल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने मालवणी पोलिसांत तक्रार केली होती.
दुसर्या घटनेत अन्य एका आठ वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाला. ही मुलगी मालवणीतील मढ परिसरात राहते. बुधवारी दुपारी तीन वाजता लाकडी काठी नळापाशी धुवत होती. यावेळी तिथे वाहिद नावाचा एक ४४ वर्षांचा मजुरी काम करणारा व्यक्ती आला आणि त्याने तिच्यासमोरच स्वतच पॅण्ट काढून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. ही मुलगी रडत घरी आल्यानंतर तिच्या आईने तिची विचारपूस केली, यावेळी तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अंधेरी येथे राहणार्या वाहिदला काही तासांत अटक केली.
तिसर्या घटनेतील तक्रारदार मुलगी ही सतरा वर्षांची असून मालाडच्या मालवणी परिसरात राहते. तिचा निरज नावाचा तरुण पाठलाग करत होता. मंगळवारी ती तिच्या आजीसोबत जात असताना निरज हा तिचा पाठलाग करत होता. त्यामुळे तिने त्याला जाब विचारला असता त्याने तिला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. तसेच त्याच्याशी बोलली नाहीतर बघून घेण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर तिने निरजविरुद्ध तक्रार केली होती. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
अन्य एका घटनेत एका बारा वर्षांच्या मुलाशी अश्लील चाळे करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. हा मुलगा मालवणी परिसरात राहतो. याच परिसरात राशिद हा राहत असून मंगळवारी त्याने त्याला मोबाईलमध्ये व्हिडीओ दाखवतो म्हणून त्याच्या घरी आणले. त्यानंतर त्याच्याशी अश्लील चाळे केले होते. घडलेला प्रकार या मुलाने त्याच्या आईला सांगताच त्यांनी मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या चारही घटनेनंतर मालवणी पोलिसांनी चार स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यातील एका गुन्ह्यांतील आरोपीस पोलिसांनी अटक केली तर तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.