गुंतवणुकीवर चांगला परवाता देण्याच्या आमिषाने फसवणुक
१.२१ कोटीची फसवणुकप्रकरणी दोन संचालकाविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ जानेवारी २०२५
मुंबई, – गुंतवणुकीवर चांगला परवाता देण्याचे आमिष दाखवून कंपनीत अनेकांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन आठजणांची १ कोटी २१ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार लोअर परेल परिसात उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्री गणेश इनोव्हेशन कंपनीच्या दोन्ही संचालकाविरुद्ध ना. म जोशी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. किशोर गजानन कोकाटे आणि अमीत सतीश सुवर्ण अशी या दोघांची नावे आहेत. या कंपनीत अनेकांनी गुंतवणुक केल्याचे बोलले जात असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गौरव गोपाळ गोसावी हे लोअर परेल येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून मालाडच्या एका खाजगी कंपनीत ते कस्टमर सर्व्हिस मॅनेजर म्हणून काम करतात. याच परिसरात किशोर कोकाटे हा राहत असून ते दोघेही एकमेकांच्या गेल्या वीस वर्षांपासू परिचित आहेत. या दोघांची चांगली मैत्री होती. त्याचा स्वतचा व्यवसाय होता. त्यातच त्याने तीन वर्षांपूर्वी श्री गणेश इनोव्हेशन नावाची एक इनव्हेस्टमेंट कंपनी सुरु केली होती. या कंपनीत त्याच्यासोत अमीत सुवर्ण हा पार्टनर होता. फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांची किशोरसोबत भेट झाली होती. त्यात त्याने त्याच्या कंपनीची माहिती सांगून ही कंपनीत शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करत असून त्यात त्यांना चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्या कंपनीत गुंतवणुक करावी. या गुंतवणुकीवर त्यांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखविले होते. गुंंतवणुकीवर दरमाह सहा टक्के परतावा देत असल्याने त्याने त्याच्या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
या कंपनीचे कार्यालय त्याच्या घरापासून काही अंतरावरील भायखळा येथील ना. म जोशी मार्ग, बकरी अड्डा, आर्शिवाद इमारतीमध्ये होते. त्यामुळे त्यांनी त्याच्या कार्यालयात जाऊन आधी एक लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्याला दरमाह सहा हजार परतावा मिळत होता. किशोर आणि अमीतवर विश्वास झाल्याने त्यांनी त्यात आणखीन गुंतवणुक केली होती. काही दिवसांनी त्याच्या कंपनीत आणखीन चार लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना आतापर्यंत ६६ हजार रुपये व्याज मिळाले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या परिचित नातेवाईक मित्रांना कंपनीची माहिती सांगून त्यांनाही गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या कंपनीत १ कोटी २१ लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर सर्वांना ऑक्टोंबर २०२२ पर्यंत नियमित व्याजाची रक्कम मिळत होती. मात्र नंतर किशोर आणि अमीत यांनी व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांनी भायखळा येथील कार्यालयासह स्वतचे मोबाईल बंद केले होते.
या दोघांनी गौरवसह त्याच्या परिचित आठजणांना लवकरच मूळ रक्कमेसह व्याजाची रककम देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांचे पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच या सर्वांनी ना. म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी गौरव गोसावी यांच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी किशोर कोकाटे आणि अमीत सुवर्ण या कंपनीच्या दोन संचालकाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष माहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत पोलिसांना आठजणांची तक्रार प्राप्त झाली असून त्यात त्यांची १ कोटी २१ लाखांची फसवणुक झाल्याचे उघडकीस आले आहे. या कंपनीत आणखीन काही लोकांनी गुंतवणुक केली आहे, त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.