चेक बाऊसिंगच्या गुन्ह्यांत राम गोपाल वर्मा दोषी

तीन महिने साधी कारावासाची शिक्षा ठोठावली

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जानेवारी २०२५
मुंबई, – सात वर्षापूर्वी झालेल्या चेक बाऊसिंगच्या एका गुन्ह्यांत सिनेदिग्दर्शक-निर्माता राम गोपाल वर्मा यांना अंधेरीतील लोकल कोर्टाने दोषी ठरविले आहे. याच गुन्ह्यांत त्यांना कोर्टाने तीन महिने साधी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्यांना याचिकाकर्त्याला आगामी तीन महिन्यांत ३ लाख ७३ हजार रुपये द्यावे लागणार आहे. ही रक्कम दिली नाहीतर त्यांना आणखीन तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे.

२०१८ सालचे संबंधित प्रकरण आहे. श्री नावाच्या एका कंपनीला राम गोपाल वर्माच्या कंपनीकडून २ लाख ६८ हजार रुपयांचे पेमेंट देणे बाकी होते. वारंवार विचारणा केल्यानंतर या कंपनीला दोन धनादेश देण्यात आले होते. मात्र राम गोपाल वर्मा यांच्या कंपनीकडून देण्यात आलेले दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. या कंपनीने त्यांच्या कंपनीला फेब्रुवारी ते मार्च २०१८ रोजी हार्ड डिस्कचा पुरवठा केला होता. मात्र पेमेंट देताना त्याने दिलेले दोन्ही धनादेश बाऊंस झाले होते. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी राम गोपाळ वर्मा व त्यांच्या कंपनीविरोधात चेक बाऊसिंगची केस अंधेरी कोर्टात दाखल केली होती. या केसची सुनावली अलीकडेच पूर्ण झाली होती. यावेळी कोर्टाने राम गोपाल वर्मा यांना दोषी ठरवून त्यांना तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

तसेच येत्या तीन महिन्यांत याचिकाकर्त्यांना दंडासहीत ३ लाख ७३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. ते पेमेंट केले नाहीतर त्यांना आणखीन तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे. हा संपूर्ण घोळ माझ्या कर्मचार्‍यांनी केला असून ते प्रकरण सात वर्षांपूर्वीचे संबंधित आहे. त्याविरोधात आपण न्यायालयात गेल्याने आताच याबाबत काहीही सांगणे उचित ठरणार नाही असे रामगोपाळ वर्मा यांच्या वतीने सोशल मिडीयावर एक पोस्ट टाकण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page